Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी Wonderlust इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स अशा चार मॉडेल्सचा समावेश आहे. तसेच कंपनीने या मॉडेल्सच्या किंमती देखील जाहीर केल्या आहेत. सुरुवातीपासूनच भारतात आयफोन्सच्या किंमती जगातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहेत. भारतात नुकतीच लॉन्च झालेल्या आयफोन १५ सिरीजची किंमत देखील कंपनीने वाढवली आहे. खासकरून प्रो मॉडेल्सची. उदाहरणार्थ पाहिल्यास १ टीबी स्टोरेज असणाऱ्या प्रो मॅक्स मॉडेलची किंमत १,९९,९९ रुपये इतकी आहे. जो या सिरीजमधील शेवटचा आयफोन आहे.

मागच्या वर्षीच्या प्रो मॉडेलच्या तुलनेत नवीन आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्सच्या किंमती अनुक्रमे ५ हजार ते २० हजारांनी वाढल्या आहेत. तर एकीकडे कंपनी अमेरिका,दुबई आणि जपानसारखाय देशांमध्ये प्रो मॉडेल्स कमी किंमतीमध्ये विकत आहे. आयफोन १५ प्रो मॅक्सच्या बेस व्हेरिएंटची किंमत १,५९,९०० रुपये आहे. हेच मॉडेल अमेरिकेमध्ये केवळ १,०६,६९३ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये ७.५ टक्के कॅलिफोर्निया राज्याच्या टॅक्सच्या समावेश आहे. अमेरिकेमध्ये एन्ड फ्लॅगशिप कमीतकमी ३० टक्के किंवा ५० हजारांनी स्वस्त मिळत आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Maharashtra government health department
महाराष्ट्र सरकार आरोग्य क्षेत्रात ‘अनुत्तीर्ण’, जन आरोग्य अभियानच्या सर्वेक्षणात १०० पैकी २३ गुण

हेही वाचा : अमेरिका, दुबई, जपानपेक्षा iPhone 15 Series भारतात स्वस्त आहे की महाग? जाणून घ्या किंमत

दुसऱ्या बाजूला अनेक नवीन फीचर्स आणि मोठ्या प्रमाणात हार्डवेअर अपग्रेड झाले असले तरी एन्ट्री लेव्हल आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसच्या भारतातील किंमतीमध्ये फार वाढ झाली नाही. याशिवाय, Apple कंपनी HDFC बँकेचे कार्ड असणाऱ्या वापरकर्त्यांना अतिरिक्त ५ हजारांची सूट देत आहे. ज्यामुळे आयफोन १४ किंमत जळपास ७५ हजार इतकी होते.

भारतात आयात कर (Import Tax )हे प्रो आणि नॉन प्रो मॉडेल्समधील किंमतीमध्ये तफावत असण्याचे एक प्राथमिक कारण आहे. कंपनी भारतात त्यांचे एंट्री लेव्हल आयफोन असेंबल करत असताना तेव्हा प्रो मॉडेल्स चीनमधून आयात करते. ज्यावर सरकार १८ टक्के कर आकारते. त्यानंतर हे मॉडेल्स ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होतात.