जीमेल हे असेच एक व्यासपीठ आहे, ज्याचा वापर दररोज लाखो लोकं संवादासाठी करतात. महत्त्वाच्या कागदपत्रांपासून ते महत्त्वाची माहिती यावर शेअर केली जाते. हा सर्व डेटा तुमच्या गूगल क्लाउडवर सेव्ह केला आहे, परंतु एखादे मेसेज किंवा फाइल डिलीट झाली असेल तर तुम्हाला ते परत बॅकअपसाठी इंटरनेटची आवश्यकता लागते. पण इथे तुम्हाला इंटरनेटशिवाय महत्त्वाच्या मेलचा व मेसेजचा बॅकअप घेता येऊ शकतो.

गुगल अनेक ऑफर्स देते, ज्या अंतर्गत तुम्ही डिलीट मेसेजचा बॅकअप घेऊ शकता. त्यामुळे तुम्हालाही जीमेल अंतर्गत महत्त्वाचे संदेश रिस्टोअर करायचे असल्यास, तुम्ही इंटरनेटशिवायही प्रवेश करू शकता. हे कसे शक्य होईल आणि बॅकअपची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Shocking video of a Girl abuses and assualt auto driver over fare in up mirzapur video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? तरुणीने शिवीगाळ करत रिक्षाचालकाला केली मारहाण, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट

अशा प्रकारे तुम्ही बॅकअप घेऊ शकता

सर्व प्रथम गूगल क्रोम ब्राउझर वापरून जीमेल खात्यात लॉग इन करा.

आता वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या सेटिंग्ज बटणावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही मेनूबारमधील Settings for All या पर्यायावर क्लिक करा.

आता मेनू बारच्या शीर्षस्थानी असलेल्या ऑफलाइन बटणावर क्लिक करा.

त्यानंतर ऑफलाइन मेल सक्षम करा निवडा.

तुमच्या टाइमलाइनसाठी ऑफलाइन संदेश आणि तुमचे प्राधान्य निवडा.

आता सेव्ह आणि चेंज बटणावर टॅब करा.

या प्रक्रियेनंतर, जेव्हाही तुम्ही ऑफलाइन असाल, तेव्हा तुम्ही क्रोममध्ये mail.google.com वर जाऊन तुमचा निवडलेला संदेश पाहू शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जीमेल (Gmail) संदेश डाउनलोड करू शकता आणि आर्चिवमध्ये जाऊन सेव्ह करू शकता. मेसेज कसा सेव्ह करायचा ते जाणून घेऊया.

सर्व प्रथम Google मध्ये My Account उघडा.

त्यानंतर डेटा मॅनेज करा आणि पर्सनलाइज या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर डेटा विभागात जा आणि डाउनलोड पर्यायावर जा.

त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचा असलेला संदेश निवडा किंवा तुम्हाला डाउनलोड करायचा असल्यास, मेसेज चेक बॉक्सवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही तुमचा डेटा सेव्ह आणि डाउनलोड करू शकता.

Story img Loader