WhatsApp new feature: इंस्टेंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर तुम्हाला अनेक फीचर मिळत आहेत. यात मेसेजिंग, कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि मीडिया फाइल सेंड करता येवू शकतात. या सर्वांसोबत आता ॲपवर कोणते ना कोणते नवीन फीचर येत राहते. डेव्हलपर्सने आता या प्लॅटफॉर्म वर असे फीचर जोडले आहे. याची लोकांना खूप उत्सूकता होती. खरं म्हणजे काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती. अशातच आणखी एक फीचर्स येत आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपचा आनंद आता डबल होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सॲपचे नवीन फीचर विंडोज बीटा व्हर्जन २.२२४०.१.० वर दिसले आहे. या फीचर अंतर्गत यूजर्सना आणखी एक नवीन साइड बार मिळेल, ज्यामध्ये चॅट लिस्ट, स्टेटस आणि सेटिंग सोबत कॉलिंग ऑप्शन देखील दिसेल. या बटणाच्या मदतीने डेस्कटॉप वापरकर्ते व्हॉट्सॲप कॉलिंगचा आनंदही घेऊ शकतील. चाचणीनंतर लवकरच हे फीचर जारी केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

(आणखी वाचा : खुशखबर: iPhone 12 मिळतोय एवढ्या स्वस्तात; तुम्ही पण म्हणाल, ‘आता घेऊनच टाकतो’ लगेच ऑफर डिटेल्स पाहा!)

स्थिर आवृत्तीमध्ये कोणतेही फीचर लॉन्च करण्यापूर्वी, कंपनी काही काळ बीटा आवृत्ती म्हणून त्याची चाचणी करते आणि जेव्हा सर्वकाही ठीक होते, तेव्हा ते सर्व वापरकर्त्यांसाठी रिलीज केले जाते. नवीन फीचरमध्ये यूजर्सना कॉलिंग टॅबमध्ये कॉलिंग हिस्ट्री पाहण्याची सुविधाही मिळणार आहे.