भारत १५ ऑगस्ट रोजी आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्यानिमिताने अनेक ई-कॉमर्स कंपन्या, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि अन्य गोष्टींवर सेल, ऑफर्स आणि डिस्काउंट देत असतात. अॅपल कंपनीने लॉन्च केलेला सर्वात शक्तिशाली आणि डेव्हलप असा iPhone 14 Pro Max हा आयफोन आहे. कंपनीच्या सध्याच्या पोर्टफोलिओमधील हे फ्लॅगशिप मॉडेल आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर ते कंपनीच्या स्टोअर्समधून लवकरच काढून टाकले जाईल.
आयफोन १४ प्रो मॅक्स यामध्ये वापरकर्त्यांमध्ये नॉचलेस डिझाइन, A16 बायोनिक चिप आणि ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आयफोन आहे. आयफोन १४ प्रो हे आजपर्यंत लॉन्च करण्यात आलेले सर्वात महागडे आयफोनचे मॉडेल आहे. तसेच त्याच्या लाइनअपमधील हे सर्वात लोकप्रिय असलेले मॉडेल होते. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
हेही वाचा : Tech Tips: तुमच्या मोबाइलची बॅटरी कशी सेव्ह करायची? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स
आयफोन १४ प्रो मॅक्स भारतात १,३९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. तथापि, आयफोन १४ प्रो मॅक्स सध्या ७५,९०१ रुपयांच्या डिस्काउंट नंतर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ६३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेला आयफोन १४ प्रो मॅक्स ११,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर १,२७,९९९ वर लिस्टेड आहे. तसेच फ्लिपकार्ट तुम्हाला तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात ६१ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ज्यामुळे आयफोन १४ प्रो मॅक्स ची किंमत ६६,९९९ रुपयांपर्यंत येते.
याशिवाय, खरेदीदारांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर ३ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. याचा अर्थ सर्व ऑफरसह आयफोन १४ प्रो मॅक्स फ्लिपकार्टवरून ६३,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.
आयफोन १४ प्रो मॅक्स लॉन्च झाल्यापासून या फोनची खूप मागणी आहे. तसेच हा फोन Flipkart आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील विक्री झाली आहे. आयफोन १४ प्रो मॅक्स चे बेस स्टोरेज मॉडेल खरेदी करणे विशेषतः कठीण होते. आयफोन १४ प्रो मॅक्स मध्ये नवीन A16 बायोनिक चिपचा सपोर्ट मिळतो. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील आहे. आयफोन १४ प्रो मध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.