भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अंतराळाच्या दोन रिमोट सेन्सिंग उपकरणांद्वारे २ सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य-L1 या पहिल्या सौरयान मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले. भारताचे हे पहिले सौरयान या वर्षी ६ जानेवारीला Lagrangian बिंदू (L1)वर पोहोचले. L1 बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. हे यान सूर्याच्या हालचालींवर कायम लक्ष ठेवण्यास सक्षम आहे.
भारताची पहिली सौरमोहीम आदित्य-L1 मंगळवारी २ जुलै २०२४ रोजी सूर्य-पृथ्वी L1 बिंदूभोवती त्याच्या स्टेशन-कीपिंग (station-keeping) युक्तीने दुसऱ्या प्रभामंडल कक्षेत जाण्यासाठी यशस्वी झाला आहे. इस्रोच्या मते, आदित्य-L1 अंतराळ यानाला प्रभामंडल कक्षेतील L1 बिंदूभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी १७८ दिवस लागतात. प्रभामंडल कक्षेतील प्रवासादरम्यान, आदित्य-L1 अंतराळयानाला विविध शक्तींच्या अडचणींचा सामना करावा लागेल; ज्यामुळे ते प्रभामंडल कक्षेतून निघून जाईल, असे अंतराळ संस्थेने सांगितले.
हेही वाचा…Apple AirPods मध्ये येणार कॅमेरा? ऑडिओ, व्हिडीओ पाहण्याचा अनुभव होणार खास; पाहा नेमके कसे करेल काम?
या कारणास्तव, आदित्य-L1 ला प्रभामंडल कक्षेत ठेवण्यासाठी, त्याचा मार्ग २२ फेब्रुवारी आणि ७ जून रोजी, असा दोनदा बदलण्यात आला. अशा स्थितीत L1 सौरयान त्याच्याभोवतीच्या दुसऱ्या प्रभामंडल कक्षेत (हॉलो ऑर्बिटवर) आपला प्रवास सुरू ठेवू शकेल याची खात्री करण्यात आली.
आजच्या ३ जून रोजीच्या तिसऱ्या स्टेशन-कीपिंग युक्तीने हे सुनिश्चित केले आहे की, त्याचा प्रवास L1 च्या आजूबाजूच्या दुस-या हॉलो ऑर्बिट मार्गावर चालू राहील, असे इस्रोने सांगितले. अंतराळयानावर काम करणाऱ्यांना विविध त्रासदायक शक्तींची माहिती मिळाल्यामुळे आदित्य L1 चे प्रक्षेपण अचूकपणे निर्धारित करण्यास मदत झाली आणि यान अचूक कक्षेत फिरत राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास मदत झाली. एजन्सीने स्पष्ट केले की, आदित्य L1 च्या सूर्य-पृथ्वी L1 Lagrangian बिंदूभोवतीच्या हॉलो कक्षेतील पहिली परिक्रमा पूर्ण करून, त्याचा वेग कायम ठेवण्याची क्षमता सिद्ध केली आहे.