इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) या टेक्नॉलॉजी इव्हेंटची घोषणा करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संचार मंत्रालयाने गुरुवारी याबद्दल घोषणा केली. हा इव्हेंट दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) चा ७ वा इव्हेंट आयोजित केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन” या विषयावर आधारित इंडिया मोबाइल काँग्रेस या इव्हेंटची थीम असणार आहे. तसेच यामध्ये ६ जी, ५ जी नेटवर्कमधील प्रगती, दूरसंचारमध्ये AI चा वाढता वापर, एज कॉम्प्युटिंग आणि इंडिया स्टॅकशी संबंधित विकासाचे सादरीकरण केले जाईल. इंडिया मोबाइल काँग्रेस २०२३ हा इव्हेंट २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथील प्रगती मैदानावर होणार आहे. याबाबतचे वृत्त business standard ने दिले आहे.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, १ हजाराचा डिस्काउंट; Infinix कंपनीकडून ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च

IMC 2023 मध्ये ब्रॉडकॉस्ट टेक्नॉलॉजी, सॅटेलाईट कम्युनिकेशन, सेमीकंडक्टर्सचे उत्पादन यासारख्या संबंधित टेक्नॉलॉजी डोमेन देखील प्रदर्शित केले जातील. इंडिया मोबाइल काँग्रेस २०२३ अनेक B2G आणि B2B फोरम आणि इंडस्ट्री राउंड टेबल्स, विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम आणि जागतिक खरेदीदार फोरम सादर करेल. या इव्हेंटमध्ये १० हजार पेक्षा अधिक सहभागी, ५००० पेक्षा जास्त CXO-स्तरीय प्रतिनिधी, ३५० हून जास्त वक्ते आणि ४०० प्रदर्शक या इव्हेंटला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

माहिती तंत्रज्ञान आणि संचार मंत्रालयाने म्हटले आहे की ,इंडिया मोबाइल काँग्रेस २०२३ Aspire नावाचा एक स्टार्टअप इव्हेंट लॉन्च करेल. जो ”दूरसंचार आणि डिजिटल डोमेनमध्ये तरुण आणि उद्योग प्रतिनिधींमध्ये” उद्योजकतेच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास मदत करेल. केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिकस आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, AI सायबर सुरक्षा, डेटा सेंटर आणि ड्रोनसह सर्व नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. “पाच भागीदार देश असतील ज्यांचा निर्णय आयएमसी परराष्ट्र मंत्रालयाशी सल्लामसलत करून घेईल.” असे अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

”इंडिया मोबाइल काँग्रेस २०२३ हे जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभाव टाकणाऱ्या डिजिटल क्रांतीमध्ये भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे प्रतीक असेल. यामध्ये ५जी, ६ जी ब्रॉडकास्टींग, सॅटेलाईट, सेमीकंडक्टर, ड्रोन, उपकरणे आणि ग्रीन टेक्नॉलॉजीजमधील अग्रगण्य प्रगतीचा समावेश आहे.” वैष्णव म्हणाले.