ट्विटर (आताचे एक्स) या मायक्रोब्लॉगिंग सारखे देशी कू ॲप चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र आता हे ॲप बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आर्थिक अडचणी आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे ॲप बंद करत असल्याचे संस्थापकांनी सांगतिले. संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयांक बिदवातका यांनी लिंक्डइनवर पोस्ट टाकून ‘गुड बाय’ म्हणत ही बातमी दिली. सोशल मिडियावर उपलब्ध असलेल्या बऱ्याच मायक्रोब्लॉगिंग साईटवर इंग्रजी भाषेची चलती आहे. मात्र कू ॲपनं देशी भाषांमध्ये संवाद साधण्याची संधी निर्माण केली होती.

लिंक्डइनवर केलेल्या पोस्टमध्ये संस्थापकांनी कू ॲप सुरू करण्यामागची भावना काय होती, हे सांगितले. “लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये तसेच सामान्यांना स्वतःच्या भाषेत सोशल मीडियावर व्यक्त होता यावे, यासाठी आम्ही कू ॲपची सुरुवात केली होती. ॲप सारख्या क्षेत्रात अमेरिकेचा दबदबा आहे. आम्हाला वाटलं की भारतही यामध्ये आपले योगदान देऊ शकतो”, असा विचार आम्ही केल्याचे ते म्हणाले.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sudha murthy rajyasabha speech in marathi
Sudha Murthy in Rajyasabha : राज्यसभेतील सुधा मूर्तींच्या पहिल्याच भाषणाची तुफान चर्चा, ‘या’ दोन मागण्यांकडे लक्ष वेधल्याने सोशल मीडियावर कौतुक!
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Modi in rajyasabha
Rajyasabha : मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग; सभापती खंत व्यक्त करीत म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, मर्यादा…”
Baby Delivery
धक्कादायक! कॉलेजच्या शौचालयात अल्पवयीन मुलीनं दिला बाळाला जन्म; प्रसूती होईपर्यंत गर्भधारणेविषयी विद्यार्थीनीचे पालक अनभिज्ञ?

२०२० साली ट्विटरला पर्याय म्हणून ‘कू’ ॲपची सुरुवात झाली होती. त्यावेळी अनेक सेलिब्रिटी, मंत्री यांनी याची जाहिरात केली होती. तसेच भारताबाहेर नायजेरिया आणि ब्राझिलमध्ये कू ॲपला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्विटरवर निळ्या चिमणीचा प्रतिकात्मक फोटो दिलेला आहे. तर कू ॲपवर पिवळ्या रंगची चिमणी देण्यात आली होती. आजपर्यंत तब्बल सहा कोटी लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले होते.

ॲपची सुरुवात झाल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये ४.१ दशलक्ष डॉलरचे भांडवल आणि त्यानंतर टायगर ग्लोबल फर्मीकडून आणखी ३१ दशलक्ष डॉलर्सचे भांडवल कू ने जमा केले होते. तरीही त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. कू ॲपवर दिवसाला वीस लाख वापरकर्ते रोज भेट देत होते. तसेच महिन्याला जवळपास १० कोटी युजर हे ॲप वापरत होते. विविध क्षेत्रातील जवळपास ९००० महत्त्वाची मंडळी सदर ॲप वापरत होते. एक्सलाही मध्यंतरी मागे टाकत कू ॲपने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. २०२२ साली भारतात एक्सला चांगली टक्कर देण्याचे काम कूने केले होते.

कू डब्यात का गेलं?

सुरुवातीच्या काही काळात यश मिळूनही कू ॲपला नंतर भांडवल गोळा करण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना नाईलाजाने कर्मचाऱ्यांची संख्या घटवावी लागली. डेलीहंटमध्ये विलीन करण्याची चर्चा फिस्कटल्यानंतर ‘कू’ ॲपची शेवटची अपेक्षाही धुळीस मिळाली. संस्थापक राधाकृष्ण आणि बिडवातका यांनी सांगितले की, ॲपसारखे तंत्रज्ञान सेवा हाताळण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे चांगले भागीदार असल्याखेरीज अशा कंपन्या चालविणे जिकरीचे होऊन बसते.