ट्विटर (आताचे एक्स) या मायक्रोब्लॉगिंग सारखे देशी कू ॲप चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र आता हे ॲप बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आर्थिक अडचणी आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे ॲप बंद करत असल्याचे संस्थापकांनी सांगतिले. संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयांक बिदवातका यांनी लिंक्डइनवर पोस्ट टाकून ‘गुड बाय’ म्हणत ही बातमी दिली. सोशल मिडियावर उपलब्ध असलेल्या बऱ्याच मायक्रोब्लॉगिंग साईटवर इंग्रजी भाषेची चलती आहे. मात्र कू ॲपनं देशी भाषांमध्ये संवाद साधण्याची संधी निर्माण केली होती.

लिंक्डइनवर केलेल्या पोस्टमध्ये संस्थापकांनी कू ॲप सुरू करण्यामागची भावना काय होती, हे सांगितले. “लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये तसेच सामान्यांना स्वतःच्या भाषेत सोशल मीडियावर व्यक्त होता यावे, यासाठी आम्ही कू ॲपची सुरुवात केली होती. ॲप सारख्या क्षेत्रात अमेरिकेचा दबदबा आहे. आम्हाला वाटलं की भारतही यामध्ये आपले योगदान देऊ शकतो”, असा विचार आम्ही केल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India own twitter alternative koo calls it quits here is why kvg
First published on: 03-07-2024 at 14:25 IST