सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत. अनेक नवीन फीचर्ससह हे स्मार्टफोन्स लॉन्च केले जात आहेत. यातच भारतीय कंपनी असणाऱ्या LAVA कंपनीने आपला सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन Lava Blaze 5G चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. हा स्मार्टफोन या आधी ऑगस्ट २०२२ मध्ये लॉन्च झाला होता. याच फोनचे नवीन मॉडेल कंपनीने लॉन्च केले आहे. हे मॉडेल नक्की कसे आहे आणि त्याचे फीचर्स व किंमत काय आहे ते आज आपण बघणार आहोत.

लावा कंपनीने Lava Blaze 5G नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. यामध्ये कंपनीने ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज केला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये लॉन्च झालेला हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणारा फोन कंपनीने लॉन्च केला होता.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

हेही वाचा : Tech Layoffs: गुगल मायक्रोसॉफ्टनंतर आता ‘ही’ टेक कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार!

Lava Blaze 5G चे फीचर्स

Lava Blaze 5G या नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन हे ७२०x१६०० पिक्सल इतके आहे. यामध्ये अँड्रॉइड १२ सह MediaTek Dimensity 700 हा प्रोसेसर आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि ३ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनमध्ये Wideline L1 चा सुद्धा सपोर्ट आहे. म्हणजेच यावर तुम्ही Amazon Prime Video आणि Netflix चे HD व्हिडिओ पाहू शकणार आहात.

या स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरा येतात. त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा असून त्यात AI सेन्सर लावण्यात आलेला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) हे फिचर यात देण्यात आले आहे. मात्र कंपनीने इतर दोन लेन्सबद्दल कोणतीही माहिती दिली नाही आहे. वापरकर्त्यांना फ्रंट म्हणजेच सेल्फी कॅमेरा हा ८ मेगापिक्सलचा मिळणार आहे.

हेही वाचा : Realme ने लॉन्च केला १०८ मेगापिक्सल कॅमेरावाला Coca Cola स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

LAVA च्या या फोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी आहे. त्याला फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. Lava Blaze 5G सोबत यूएसबी टाईप सी पोर्ट देखील मिळेल. त्याशिवाय फोनमध्ये 4G VoLTE, ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ v5.1 चा सपोर्ट वापरकर्त्यांना मिळणार आहे.

किती असणार किंमत ?

Lava Blaze 5G हा स्मार्टफोन मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आला असला तर कंपनीने याचे नवीन मॉडेल भारतात लॉन्च केले आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या ११,९९९ रुपये आहे. लॉन्चिंग ऑफर म्हणून तुम्ही हा फोन ११,४९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. या फोनची विक्री १५ फेब्रुवारीपासून कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून आणि Amazon India वर सुरु होणार आहे. वापरकर्ते हा स्मार्टफोन ग्लास ब्ल्यू, ग्लास ग्रीन या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत.