सायबर हल्ले हे सातत्याने वाढतच आहेत, हल्लेखोर विविध प्रकारच्या युक्त्या वापरत आहेत. तर आता इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अंतर्गत (MeitY), ने आयफोन आणि आयपॅड वापरकर्त्यांसाठी चेतावणी जारी केली आहे, ज्यामध्ये काही असुरक्षा हायलाइट केल्या आहेत. ज्यांचा संभाव्य हॅकर्सकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तर CERT-In ने सफारी ब्राउझर, व्हिजन प्रो, मॅकबुक्स आणि ॲपल वॉचेससह इतर उत्पादनांसाठी फॉलो-अप अलर्ट जारी केला आहे.
१५ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या पहिल्या चेतावणीमध्ये CERT-In ने सांगितले की, ॲपलच्या आयओएस आणि आयपॅडओएसमध्ये अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत ; ज्या हॅकरला अनियंत्रित कोड प्रदर्शित करते, संवेदनशील माहिती आणि लक्षितांवर सुरक्षा निर्बंध बायपास करण्यास परवानगी देतात.
सायबरसुरक्षा एजन्सीने म्हटले आहे की, या असुरक्षा अनेक कारणांमुळे युजर्सच्या ब्लूटूथ, मीडियारिमोट, फोटो, सफारी आणि वेबकिट घटकांमध्ये हॅकर्सना अयोग्य प्रवेश करण्यास परवानगी देते. ज्यामध्ये एक्स्टेंशनकिट, शेअर शीट, मेमरी करप्शन, लॉक स्क्रीन आणि टाइमिंग साइड चॅनेलमध्ये प्रायव्हसीसंबंधित समस्यादेखील आहेत.
हेही वाचा…युजर्सची चिंता मिटली! आता स्टेटसवर एक मिनिटांचा VIDEO करता येणार शेअर; पाहा डिटेल्स
CERT-In च्या चेतावणीनुसार, या समस्येमुळे आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयफोन एक्स, आयपॅड 5th जनरेशन, आयपॅड प्रो ९.७ इंच आणि आयपॅड प्रो १२.९ सारख्या १६.७. ६ आवृत्त्यांवर चालणाऱ्या आयओएस आणि आयपॅडओएस डिव्हाइसवर परिणाम झाला. ही समस्या आयपॅड प्रो १०.५ आणि ११ इंच, आयपॅड एअर जेन आणि आयपॅड एअर 3rd जेन आणि आयपॅड एअर 6th जनरेशन आणि नंतरच्या आवृत्त्यांसारख्या १७.४ च्या आयओएस आणि आयपॅडओएस आवृत्त्यांवरदेखील परिणाम करते आहे. सीईआरटी-इन म्हणते की, वापरकर्त्यांनी त्यांचे आयफोन आणि आयपॅडच्या नवीन आवृत्तीम प्रोटेक्ट केले पाहिजेत, जेणेकरून या असुरक्षिततेपासून या युजरचे संरक्षण होईल.
व्हिजन प्रो, मॅकबुक्स आणि ॲपल टीव्ही:
१९ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या एका निर्णयात CERT-In ने म्हटले आहे की, Apple उत्पादनांमध्ये exploited नोंदवण्यात आल्या आहेत. सायबर सुरक्षेने सांगितले की, ही चेतावणी कोड अमलात आणण्यासाठी, सुरक्षा निर्बंधांना बायपास करण्यासाठी, संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी, विशेष अधिकार प्राप्त करण्यासाठी हॅकर्सला माहिती प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी मदत करू शकते. या सुरक्षा ॲपल व्हिजन प्रो, ॲपल टीव्ही एचडी, ॲपल टीव्ही ४के, ॲपल वॉच सीरिज ४ आणि ॲपल macOS Soonoma 14 आणि नंतरच्या आवृत्त्यांवर तुम्हाला पाहायला मिळतील.