भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्वदेशी ‘ड्रोनी’ या ड्रोन कॅमेराला लॉन्च केले आहे. अत्याधुनिक सुविधा असलेले हे ड्रोन ‘गरुडा एयरोस्पेस’ या कंपनीने निर्मित केले आहे. धोनी या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. या कंपनीने बनवलेला ‘ड्रोनी’ हा कॅमेरा २०२२ च्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होईल, अशी माहिती कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश यांनी दिली आहे.

ड्रोन उडवण्यासाठी लागणार परवानगी ? नियम तोडल्यास एक लाख रुपये दंड, जाणून घ्या नियम

ulta chashma
उलटा चष्मा: फॉर्मसाठी ‘हनुमानउडी’
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Shikhar Dhawan Spotted With Mystery Girl At Airport Avoids Sharing Frames Video Goes Viral
Shikhar Dhawan Video: घटस्फोटानंतर शिखर धवन पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लबरोबरचा Video होतोय व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
sangeet manapman teaser release
Video : दिवाळीच्या मुहूर्तावर ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ तारखेला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
maps artificial intelligence
कुतूहल : नकाशांच्या भविष्याचा नकाशा
Cyber ​​police station in Thane, Cyber ​​police station,
ठाण्यातील सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

“ड्रोनी ड्रोन हा पूर्णत: स्वदेशी बनावटीचा आहे. याचा उपयोग विविध उद्दिष्टांसाठी पाळत ठेवण्यासाठी होऊ शकतो. ड्रोन अत्यंत कार्यक्षम, अखंड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आला आहे. स्वदेशी ड्रोनच्या निर्मितीतून भारताला केवळ आत्मनिर्भरच नाही तर जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवून देणे आमचे लक्ष्य आहे”, असे ‘गरुडा एयरोस्पेस’ चे संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश यांनी म्हटले आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये पार पडलेल्या ‘ग्लोबल ड्रोन एक्स्पो’मध्ये जगातील १४ आंतरराष्ट्रीय ड्रोन कंपन्यांच्या १५०० हून जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात गुंतवणूकदार, भागीदारांसह तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

विश्लेषण : महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतला, मग अन्य क्रिकेट लीगमध्ये का खेळत नाही? नेमके कारण काय?

‘गरुडा एयरोस्पेस’ कंपनीकडून शेती, सौर ऊर्जा, औद्योगिक क्षेत्रासह इतर क्षेत्रांसाठी ड्रोन कॅमेरे पुरवण्यात येतात. चेन्नईमध्ये पार पडलेल्या एका सोहळ्यात ‘किसान ड्रोन’चेही लॉन्च करण्यात आले. बॅटरीने चालणाऱ्या या ड्रोनमुळे दर दिवशी ३० हेक्टर क्षेत्रामध्ये खतांची फवारणी करणं शक्य होणार आहे. करोना काळामध्ये शेतीमध्ये मन रमवल्याचे या कार्यक्रमात महेंद्रसिंह धोनीने सांगितले. शेती क्षेत्रासाठी ड्रोनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे धोनीने म्हटले आहे.