PM Modi joins WhatsApp Channels: व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘व्हॉट्सअॅप चॅनल’ हे नवीन फीचर्स लाँच केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही जगभरातील अनेक सेलिब्रिटीशी थेट जोडल्या जाल. हे फीचर जगभरातील १५० देशांमध्ये व्हॉट्सअॅपने लाँच केलं आहे. यात भारताचाही समावेश आहे. आता देशाचे नरेंद्र मोदी सुध्दा या अॅपशी जोडल्या गेले आहेत. यामुळे तुम्ही पंतप्रधान मोदींशी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट होऊ शकता. तुमच्या मनात प्रश्न असेल की त्यांच्या नंबरशिवाय तुम्ही त्यांच्याशी कसे कनेक्ट होऊ शकता?
वास्तविक, तुम्ही व्हॉट्सअॅपच्या ‘व्हॉट्सअॅप चॅनल’ या नवीन फीचरच्या मदतीने हे करू शकता. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने मागील आठवड्यातच WhatsApp चॅनेल वैशिष्ट्य आणले आहे, जे हळूहळू सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही पीएम मोदींशी संबंधित अपडेट्स आणि पोस्ट दिसणार आहेत. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फॉलो करू शकता.
कसे फॉलो करणार?
- पीएम मोदींशी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल.
- तुमच्या व्हॉट्सअॅपवर चॅनल फीचर नसेल तर ते अपडेट करा.
- यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
- तुमच्या लक्षात येईल की, Status च्या ऐवजी आता तुम्हाला Update चा पर्याय दिसेल.
- तुम्ही येथे क्लिक करताच, तुम्हाला चॅनेल दिसू लागतील. तुम्हाला Find Channels या पर्यायावर क्लिक करून नरेंद्र मोदी असे लिहावे लागेल.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर पीएम मोदींचे चॅनल दिसेल, ज्याला तुम्ही फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी तुम्हाला + बटण टॅप करावे लागेल.
जर तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करूनही हा पर्याय मिळत नसेल, तर तुम्ही काही दिवस थांबावे. कंपनीने गेल्या आठवड्यात हे वैशिष्ट्य आणले असल्याने, सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागत आहे. लवकरच तुम्हाला हे फीचर मिळेल.
(हे ही वाचा : पहिल्यांदाच ‘इतक्या’ स्वस्तात मिळताहेत Apple iPhones, खरेदीसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा! )
तुम्ही पण मेसेज करू शकता का?
चॅनल फॉलो करणे म्हणजे तुम्ही त्यावर मेसेज करू शकता असा नाही. याद्वारे तुम्ही फक्त त्या चॅनलशी संबंधित अपडेट्स मिळवू शकता. प्रशासक जे काही संदेश पाठवेल, ते सर्व संदेश तुम्हाला ब्रॉडकास्टसारखे मिळतील. तुमचा नंबर चॅनलवर सुरक्षित आहे. म्हणजेच तुमचा नंबर इतर कोणालाही दिसणार नाही.
तुम्ही तुमचे स्वतःचे चॅनेल देखील तयार करू शकता का?
तुम्ही तुमचे स्वतःचे चॅनल अगदी सहज तयार करू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करून अपडेट ऑप्शनवर जावे लागेल. येथे तुम्हाला चॅनेलसह तीन ठिपके दिसतील, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला चॅनेल शोधा आणि चॅनेल तयार करा असा पर्याय दिसेल.
तुम्ही तुमचे सर्व आवश्यक तपशील येथे टाकून चॅनेल तयार करू शकता. मात्र, चॅनेल तयार करण्याचा पर्याय सर्व वापरकर्त्यांना दिसत नसून, व्हॉट्सअॅपच्या एफएक्यू पेजवर चॅनेल तयार करण्याची प्रक्रिया देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला हे फीचर मिळेल.