IRCTC Retiering Room Booking: भारतात रेल्वेने लाखो लोक दररोज प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि तुलनेने स्वस्त असल्यामुळे अनेकांचे रेल्वे (Indian Railway) प्रवासालाच प्राधान्य असते. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेचे अनेक नियम आहेत. रेल्वे मार्फत प्रवाशांना विविध सुविधा पुरवल्या जातात. रेल्वे आपल्या प्रवाशांना अशा अनेक सुविधा पुरवते, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी खर्चात स्टेशनवर हॉटेल सारख्या रुमचा आनंद घेऊ शकता. समजा तुमच्या ट्रेनला उशीर असेल किंवा तुमची ट्रेन वेळेपूर्वी पोहोचली असेल, तर तुम्हाला अतिशय कमी दरात या हॉटेल सारख्या असणाऱ्या रुमचा आनंद घेऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच राहावे लागत असेल तर तुम्हाला स्टेशनवरच एक खोली मिळेल. तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा कुठेही जाण्याची गरज नाही. अतिशय कमी किमतीत या खोल्या उपलब्ध असतील. किती रुपयांत आणि तुम्ही तिकीट कसे बुक करू शकता, जाणून घेऊया.

(हे ही वाचा : तुम्हीही टॉयलेटमध्ये प्रिय स्मार्टफोन वापरता का? सावधान! ‘या’ रिपार्टने केला खुलासा, धक्कादायक माहिती समोर)

हॉटेलसारखी रूम फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये करा बुक

रेल्वे स्थानकावर प्रवाशांना राहण्यासाठी हॉटेल सारख्या खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही एक एसी खोली असेल आणि त्यामध्ये झोपण्यासाठी बेड आणि रूमच्या सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध असतील. रात्रभर रूम बुक करण्यासाठी तुम्हाला १०० ते ७०० रुपये द्यावे लागतील.

जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर हॉटेलसारखी रुम बुक करायची असेल, तर खालील प्रोसेस फाॅलो करा

बुकिंग कसे करावे?

  • प्रथम तुमचे IRCTC खाते उघडा
  • आता लॉगिन करा आणि माय बुकिंग वर जा
  • रिटायरिंग रूमचा पर्याय तुमच्या तिकीट बुकिंगच्या तळाशी दिसेल
  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रूम बुक करण्याचा पर्याय दिसेल
  • पीएनआर नंबर टाकण्याची गरज नाही
  • पण काही वैयक्तिक माहिती आणि प्रवासाची माहिती भरावी लागेल
  • आता पैसे भरल्यानंतर तुमची खोली बुक केली जाईल