नेहमी प्रवासादरम्यान जेवणाची चिंता सर्वांना असते. त्यातच रेल्वेतून लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास जेवणाची सोय आधीच करावी लागते. फूड डिलीवरी सर्विस झूप (Jhoop) ने प्रवाशांची ही चिंता मिटवली आहे. या नव्या सर्विसमुळे थेट ट्रेनमध्ये तुम्हाला जेवणाची ऑर्डर मिळवता येणार आहे. व्हाट्सअ‍ॅपवरून सहजरित्या ही ऑर्डर करता येणार आहे. यासाठी फूड डिलीवरी सर्विस झूपने जिओ हॅप्टिक (Jio Haptik) सोबत पार्टनरशिप केली आहे. यावर जेवण ऑर्डर करण्याच्या स्टेप्स जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Whatsapp Trick : आता अ‍ॅपशिवाय करता येणार चॅट; व्हॉट्सअ‍ॅपची ही भन्नाट शॉर्टकट ट्रिक वापरून पाहा

‘झूप’वरून जेवण ऑर्डर करण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • सर्वात आधी +91-7042062070 हा झूप व्हाट्सअ‍ॅप चैटबोट नंबर सेव्ह करा.
  • त्यानंतर तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप उघडा आणि झूपच्या सेव्ह केलेल्या नंबरच्या चॅटवर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला तुमचा १० अंकांचा पीएनआर (PNR) नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तिथे ट्रेन नंबर, सीट नंबर अशी माहिती समोर येईल. झूपकडून डिटेल तपासले जाईल.
  • माहिती तपासून झाल्यावर स्टेशन निवडण्याचा पर्याय दिसेल. ज्या स्टेशनवर तुम्हाला जेवणाची ऑर्डर हवी आहे ते स्टेशन निवडा.
  • त्यानंतर झूपकडून अनेक हॉटेल्सचा पर्याय दिला जाईल, त्यातून मला हवा तो पर्याय निवडून जेवणाची ऑर्डर देऊ शकता.
  • इथे पेमेंट मेथड निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही त्या ऑर्डरचे लोकेशन ट्रॅक करू शकता.
  • तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर तुमच्या जेवणाची ऑर्डर मिळेल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway passengers can now order food on whatsapp during train journey know more pns