भारतीय रेल्वेने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. याला जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क म्हटले जाते. भारतातील १७ झोनमध्ये १९ हजारांहून अधिक रेल्वे धावतात. या १९ हजार रेल्वे गाड्या विविध श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. इमू आणि मेमू रेल्वेचाही यात समावेश होतो. भारतीय रेल्वे आपल्या गरजेनुसार, वेगवेगळ्या श्रेणीतील रेल्वेचा वापर करते. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन App लॉन्च केले आहे. प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुखद करण्यासाठी 3i Infotech , NuRe Bharat Network आणि RailTel ने PIPOnet मोबाईल App तयार केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PIPOnet या मोबाइल App मध्ये ई-तिकीटच्या सुविधेसह प्रवास, आरक्षण या सुविधा मिळणार आहेत. NuRe Bharat Network चे सीईओ सॅक्स कृष्णा म्हणाले, ”नवीन अ‍ॅप येत्या दोन आठवड्यांमध्ये अँड्रॉइड प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रवासी हे अ‍ॅप डाउनलोड करू शकणार आहेत.” याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

हेही वाचा : झोमॅटोने लॉन्च केली UPI पेमेंट सर्व्हिस, जाणून घ्या कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे?

अ‍ॅपचा वापर करणारे वापरकर्ते त्याच्या मदतीने ट्रेनचे तिकीट बुक करण्यापासून ते राहणे , खाणे व इतर सुविधांचाही लाभ घेऊ शकणार आहेत. PIPOnet च्या मदतीने जाहिरातदारांना भारतातील टियर १,२,३ आणि ४ शहरांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. PIPOnet मध्ये जी कमाई होईल त्यातील ४० टक्के वाटा हा Nure Bharat Network ला मिळणार आहे.

अ‍ॅपबद्दल माहिती देताना सीईओ सॅक्स कृष्णा म्हणाले, ” या अ‍ॅपच्या मदतीने अशा जाहिरातदारांना देखील मदत होणार आहे ज्यांना आपली जाहिरात रेल्वे प्रवाशांपर्यंत पोचवायची आहे. या अ‍ॅपमध्ये सर्व प्रकारची फीचर्स उपलब्ध करण्यासह पुढील पाच वर्षांत १,००० कोटी रुपयांची कमाई करण्याचे NuRe Bharat Network चे उद्दिष्ट आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway railtel bharat nure network launch piponet app watch netflix ola uber and all many services check details tmb 01