भारतीय रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी सातत्याने सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करते. आता आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांसाठी अशी एक सुविधा आणत आहे ज्यात तुम्ही बोलताच तुमचं रेल्वे तिकीट बुक होणार आहे. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करताना माहिती भरण्याची गरज भासणार नाही. आता तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करताना टाईप करून माहिती भरावी लागते. मात्र भविष्यात तुम्ही फक्त बोलून सर्व माहिती भरू शकता. यासाठी आयआरसीटीसी नवी सुविधा घेऊन येत आहे. आस्क दिशा २.० या नावाने प्रवाशांना ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.
तिकीट बुक करणे होईल सोपे
आयआरसीटीसी सध्या AI वर आधारित आस्क दिशा २.० या नव्या प्लॅटफॉर्मची यशस्वी चाचणी झाली आहे. यामुळे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या चॅटबॉटमध्ये व्हॉइस कमांड वापरून संपूर्ण ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे. यात प्रवासी बोलून सहज आपलं रेल्वे तिकीट बुक करू शकतात. IRCTC च्या या नवीन अपडेटमुळे तिकीट बुक करणे आता सोपे होणार आहे.
भारतात धावणार हायड्रोजन ट्रेन! ग्रीन रेल्वेत भारत होणार ‘नंबर वन’? यामागचं कारण जाणून घ्या
आयआरसीटीसीचे म्हणणे आहे की, व्हॉईस कमांडद्वारे तिकीट बुकिंगची चाचणी सुरू यशस्वी झाली आहे. आता प्रवाशांना लवकरच ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एवढेच नाही तर प्रवाशांना तिकिट रद्द करण्यासह प्रिंट आणि शेअरही ऑप्शन देण्यात येईल. यात प्रवासी ट्रेनशी संबंधित कोणतीही माहिती व्हॉईस कमांडद्वारेच मिळू शकतात.
आरआयसीटीसीने प्रवाशांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आस्क दिशा नावाचं फिचर तयार केलं आहे. या फीचरद्वारे प्रवासी प्रश्न इंग्रजी आणि हिंदीमध्ये विचारू शकतात. याच फिचरमध्ये काही बदल करत व्हॉईस कमांड ऑप्शन अॅड केल जात आहे.
आस्क दिशा २.० ची वैशिष्ट्ये
१) तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या आस्क दिशा २.० चॅटबॉटच्या मदतीने तिकीट बुक करता येईल.
२) तिकीट बुकिंगसाठी ग्राहक चॅटबॉटवर टाईप करुन किंवा व्हॉइस कमांड देऊन तिकीट बुक करु शकतात.
३) यात ग्राहकांना तिकीट रद्द करण्यास रद्द केलेले तिकीटांच्या परताव्याची स्थिती देखील तपासता येईल.
४) युजर्स आस्क दिशा २.० प्लॅटफॉर्मवरील चॅटबॉटवरून त्यांच्या पीएनआर स्थितीबाबत चौकशी करु शकतात.