सध्याचा काळ हा इंटरनेटचा काळ आहे. भारतामध्ये सध्या ५जी नेटवर्क सुरू झाले आहे. देशातील रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना ५ जी नेटवर्कची सुविधा देत आहेत. आता ६ जी नेटवर्कबद्दल देखील मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय दळणवळण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी भारत 6G अलायन्सच्या लॉन्चिंगची घोषणा केली. ५जी च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर भारतात पुढील जनरेशनची टेक्नॉलॉजी लॉन्च करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा उपक्रम असणार आहे.

भारत ६ जी अलायन्स, दूरसंचार टेक्नलॉजी प्रगत करण्याच्या आणि भारतामध्ये ६ जीच्या डेव्हलपमेंटला पुढे नेण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तसेच इतर विभागांमधील प्रमुख भागधारकांना एकत्र आणते. एका कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ६जी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. ज्यात आधीपासूनच २०० पेक्षा जास्त पेटंट मिळवले आहेत. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
NIA Raids on suspicion of links with Jaish e Mohammed terror outfit Mumbai news
एनआयएचे ८ राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापे; राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडीचा समावेश
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
Pune Railway Station in 1965
१९६५ मध्ये पुणे स्टेशन कसं होतं? VIDEO एकदा पाहाच
The winter session of Legislature starts December 16 in Nagpur as per Agreement
नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला आपला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; केवळ ८ मिनिटांमध्ये होणार…, ऑफर्स एकदा बघाच

भारत ६ जी अलायन्सशिवाय सरकार येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये दूरसंचारमध्ये काही सुधारणा करण्याच्या दृष्टीने योजना तयार करत आहे. ६जी चे अपेक्षित आगमन ५जी पेक्षा जवळपास १०० पट अधिक वेग प्रदान करेल. भारत ६जी अलायन्स एक प्रगत दूरसंचार टेक्नॉलॉजी आणि पडलं दशकाला आकार देणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चेसाठी व्यासपीठ म्हणून काम करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी मार्चमध्ये ६जी व्हिजन डॉक्युमेंटचे लॉन्चिंग केले होते. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये पुढील काही वर्षांत 6G दूरसंचार सेवा विकसित आणि लॉन्च करण्याच्या भारताच्या सर्वसमावेशक योजनांची रूपरेषा देण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये २.७० लाख ५जी साइट्सच्या स्थापनेसह ५जी नेटवर्क त्वरित सुरु करण्याच्या भारताच्या यशाची कबुली दिली.

Story img Loader