Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण गुगलवर जाऊन ती शोधत असतो. सध्या सर्वत्र AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वेगाने पसरत आहे. आता गुगलने देखील भारतीय वापरकर्त्यांसाठी सर्च विथ जनरेटिव्ह AI प्रयोग लॉन्च केला आहे. गुगलने त्यामध्ये काही फीचर्सचा समावेश केला आहे. ज्यामुळे सर्च ”पूर्वीपेक्षा अधिक सहज आणि स्मार्ट होईल.” असे कंपनीचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जे वापरकर्ते सर्च लॅब्सच्या माध्यमातून फीचरची चाचणी करण्यासाठी साइन अप करतात ते वापरकर्ते क्रोम आणि गुगल अॅपवर अॅक्सेस करू शकणार आहेत. मात्र गुगलवर पूर्वीसारखे सर्च करणे सुरूच राहणार आहे. सर्च जनरेटिव्ह एक्सपीरिअन्स (SGE ), ज्याला आधीच काही ठिकाणी वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले गेले आहे. ते येथे भारतात इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे. देशातील ज्या राज्यात हिंदी भाषेचा वापर आहे तिथे वापरकर्ते या दोन्ही भाषांमध्ये एकाच वापर करू शकतील. भारताच्या अन्य भागामध्ये केवळ इंग्रजीचाच वापर केला जाईल. तसेच कंपनी टेक्स्ट-टू-स्पीच हा पर्याय देखील यामध्ये जोडणार आहे. तसेच लवकरच व्हॉइस सर्च फिचर देखील यात जोडले जाईल.
एसजीई ही गुगलच्या जनरेटिव्ह AI मध्ये गुगलच्या डेव्हलपमेंटच्या आधारावर सर्चची ”नवी क्रांती” आहे. ”जनरेटिव्ह AI ची ताकद थेटपणे गुगल सर्चमध्ये पूर्णपणे नवीन प्रकारांच्या प्रश्नांना परवानगी देते ज्याबद्दल तुम्ही कधी विचार केला नसेल की सर्च हे उत्तर देऊ शकते. तसेच माहिती सांगण्यासाठी पद्धत बदलते ज्यामुळे तुम्हाला तेथे काय आहे ते समजून घेण्यास मदत मिळते.” असे गुगल सर्चचे जनरल मॅनेजर पुनेश कुमार म्हणाले. ते पुढे म्हणाले, या फीचरमुळे विशेषतः नवीन इंटरनेट वापरकर्त्यांना मदत मिळेल. जे सहसा ऑनलाइन माहितीच्या साठ्यामुळे भारावून जाऊ शकतात. ”विषय पटकन समजून घेण्यास ते सक्षम होतील, नवीन दृष्टिकोनाच्या मदतीने गोष्टी सहजपणे पूर्ण करू शकतील.”
या ठिकाणी माहितीचा दर्जा ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे हे मान्य करत, पुनेश कुमार म्हणाले, ”आम्ही अब्जावधी वापरकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्या गुणवत्तेचा दर्जा कायम राखतो. जे सर्च मध्ये आमच्याकडून करण्यात आलेल्या कोणत्याही बदलांवर आणि आमच्यावर विश्वास ठेवतात. आमचे काम आमच्या रँकिंग सिस्टीममध्ये आणि माहितीच्या दर्जाला सखोलपणे समजून घेण्यासाठी मागील दोन दशकांमध्ये विकसित करण्यात आलेल्या सर्व गोष्टींचा फायदा घेते.” ते म्हणाले की, सुरू करण्यात आलेल्या नवीन फीचरमध्ये वापरकर्त्यांसाठी सुरक्षेचा पर्याय देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. कुमार म्हणाले, हे फिचर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्नॅपशॉट तयार करत असले तरी देखील ज्यांना सर्व माहिती अगदी तपशीलवार वाचायची आहे त्यांच्यासाठी मुख्य स्रोत समोर ठेवणार आहे.
कुमार पुढे म्हणाले की सर्च अॅड्स या अनुभवाचा मूळ भाग म्हणून बनून राहतील. ”आज ज्या पद्धतीने जाहिराती दिसत आहेत त्याचप्रमाणे जाहिराती संपूर्ण पेजवर जाहिरातीच्या स्लॉटमध्ये दिसतील.” याशिवाय, या सर्च प्रमाणेच आरोग्य, अर्थसारख्या विषयांसाठी ज्यांना आत्मविश्वासाची गरज असते, त्यांच्यासाठी जनरेटीव्ह AI संचालित स्नॅपशॉट अजिबात ट्रिगर करू शकत नाहीत असे कुमार यांनी स्पष्ट केले. ”म्हणून असे नाही की, जनरेटीव्ह AI प्रत्येक गोष्टीला ताकद देणे सुरू करेल.” त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना indianexpress.com ला सांगितले.
हेही वाचा : विश्लेषण: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सायबर गुन्हेगारी वाढणार?
वापरकर्ते गुगल अॅप किंवा क्रोम डेस्कटॉपमध्ये लॅब्स आयकॉनवर क्लिक करून SGE वापरण्यासाठी आणि यासाठी काम करणाऱ्या टीमसह थेट फीडबॅक शेअर करण्याचा पर्याय निवडूवू शकतात. क्रोम डेस्कटॉप पर्याय भारतात ३१ ऑगस्ट म्हणजेच आजपासून उपलब्ध होणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएसवरील गुगल अॅपसाठी ते येत्या आठवड्यभरात उपलब्ध होणार आहे.