व्हॉट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. आपले फोटोज, व्हिडीओज एकमेक्नाशेअर करू शकता. स्टेटसला ठेवू शकता. व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स करू शकता. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. ज्यामुळे वापरकर्त्यांना हे प्लॅटफॉर्म वापरताना चांगला अनुभव मिळावा. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या भारतातील वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता भारतातील वापरकर्त्यांना युपीआय Apps, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डआणि नेट बँकांच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट करता येणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेटाच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डआणि नेट बँकिंग याशिवाय अधिक पेमेंटचे पर्यांयसाठी Razorpay आणि PayU सह भागीदारी केली आहे. वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने हे पाऊल उचलले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : Realme ने नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला ‘हा’ स्मार्टफोन; १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि.., जाणून घ्या

”आम्ही तुमच्यासाठी एक असे फिचर आणणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅटिंगदरम्यान सहजपणे खरेदी करू शकता. आजपवून भारतात लोकं त्यांच्या कार्टमध्ये गोष्टी जोडू शकतात. तसेच भारतात चालणाऱ्या सर्व युपीआय Apps च्या माध्यमातून डेबिट आणि क्रेडिट कार्डांसारख्या त्यांच्या आवडत्या पद्धतीनुसार पेमेंट करू शकतील. आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी पेमेंट करणे हे मेसेज पाठवण्याप्रमाणे सोपे करण्यासाठी Razorpay आणि PayU सह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.” असे कंपनीच्या ब्लॉगमध्ये म्हणण्यात आले आहे.

युपीआय Apps मध्ये सध्या गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि अन्य अनेक अ‍ॅप्सचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे भारतात ५०० मिलियनपेक्षा अधिक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅप पे वापरकर्ते केवळ १०० मिलियन इतकेच आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदतीचे ठरेल. जे कंपनीच्या वाढीसाठी ”पुढील प्रमुख आधारस्तंभ” बनेल. ”व्हॉट्सअ‍ॅप पे च्या वापरकर्त्यांची संख्या भारतात मर्यादित असेल. मात्र इतर पद्धती वापरून व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट करण्यासाठी परवानगी असणाऱ्या वापरकर्त्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. ” असे व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian whatsapp users can make upi google pay phone pay paytm debit and credit card apps payment tmb 01