काल भारतातील काही प्रमुख यूट्यूबर्सवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या कन्टेंट क्रिएटर्सचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध स्टॅडअप कॉमेडियन तन्मय भट्ट, ऐश्वर्या मोहनराज; तसेच बिग बॉस १६ मधील स्टार स्पर्धक अब्दु रोजिक यांचे Youtube चॅनल देखील हॅक झाले होते. या एकूण प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तन्मय भट्ट हा स्टॅडअप कॉमेडी करण्यासह यूट्यूबवरही फार सक्रिय आहे. यूट्यूबवर त्याचे अनेक चॅनल्स पाहायला मिळतात. त्यातील प्रमुख चॅनल ज्यावर त्याचे ४.४ दशलक्ष फॉलोवर्स आहेत ते हॅकर्संद्वारे हॅक करण्यात आले. पुढे या चॅनलचे नाव बदलून ‘टेस्ला कॉर्प’ असे ठेवण्यात आले. या संबंधित तन्मयने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने Youtube, Google ला टॅग करत माझे यूट्यूब आणि जीमेल अकाउंट हॅक झाले आहे. तुमची मदत हवी आहे. कृपया DM करा असे म्हटले आहे. हॅकर्सने तन्मयच्या चॅनलवरील त्याचे व्हिडीओ हटवल्याची माहितीदेखील समोर आली होती.

आणखी वाचा – WWDC 2023: आता डोळे आणि आवाजाने कंट्रोल करता येणार Apple चा ‘हा’ रिअ‍ॅलिटी हेडसेट, एकदा फीचर्स पहाच

तन्मयसह त्यांची मैत्रिण ऐश्वर्या मोहनराजचे यूट्यूब चॅनल देखील हॅक झाले होते. ७०,००० पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेल्या तिच्या चॅनलवर हॅकर्संनी टेस्ला इव्हेंटच्या २ लाईव्ह स्ट्रीमचे चित्र लावले होते. तिने देखील ट्वीट करत गुगलकडे तक्रार केली होती. तिने ट्वीटमध्ये @TeamYouTube, हाय, माझे जीमेल अकाउंट हॅक झाले आहे आणि मला माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रवेश करता येत नाहीये. तुम्ही कृपया मला मदत करु शकता का? असे लिहिले आहे. तिच्या चॅनलचे कव्हर देखील टेस्ला कारच्या फोटोंनी बदलले गेले आहे.

Apple WWDC 2023 : अ‍ॅपलने Mixed Reality हेडसेट, iOS 17 सह लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट्स, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

बिग बॉस १६ चा स्पर्धक अब्दु रोजिकचे अकाउंट देखील हॅक झाले आहे. त्यानेही गुगलकडे त्याबाबत तक्रार केली आहे. त्याचे यूट्यूबवर १ दशलक्षपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. या प्रसिद्ध यूट्यूबर्सच्या तक्रारींना यूट्यूबने प्रतिसाद दिला आहे. यूट्यूबच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन या ट्वीट्सवर रिप्लाय देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये टेस्ला हे नाव ऐकायला येत आहे. एकूणच टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांची लोकप्रियता पाहता हॅकर्सनी मुद्दामून या प्रकरणात त्यांच्या नावाचा वापर केला असू शकतो असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian youtubers including tanmay bhat aishwarya mohanraj abdu rojic were cyber attacked theri official youtube channels hacked by hackers know more yps