Cheapest 5G Smartphone: भारतात मागच्या महिन्यात ५ जी सेवा सुरु करण्यात आली असून यामुळे आता अनेक जण ५जी स्मार्टफोन खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. स्मार्टफोन निर्माती कंपनी लावा इंडियाने (Lava) आपला नवीन ५जी फोन ‘Lava Blaze 5G’ लॉन्च केला आहे. हा देशातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन असून हा स्मार्टफोन बाजारामध्ये चांगल्या कॅमेरा क्वालिटीसह लाँच करण्यात आला आहे. लावाने लाँच केलेला हा स्मार्टफोन सॅमसंग, ओपोच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या ५ जी मोबाईल सोबत स्पर्धा करू शकेल.

Lava Blaze 5G वैशिष्ट्ये

Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
uke send bomb threats email regarding Jagdish Uikes terrorism book publication
विमानात बॉम्ब असल्याचे फोन, तो का करायचा ? कारण आहे धक्कादायक
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Lashkar e Taiba  Pakistani commander Usman killed in an encounter in an anti terror operation
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

या स्मार्टफोनमध्ये, कंपनी १६००×७२० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५-इंच HD + LCD पॅनेल देत आहे. त्याचा रीफ्रेश दर ९०Hz आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम, ३ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे, ज्याला तुम्ही मायक्रो SD कार्डच्या मदतीने १TB पर्यंत वाढवू शकता. Lava Blaze 5G दोन रंग पर्याय ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ५जी नेटवर्कसह ४जी नेटवर्कवर काम करेल. कंपनीच्या मते, हा फोन ५जी च्या सर्व भारतीय बँडवर चालेल. OS- हा फोन Android १२ सह सादर करण्यात आला आहे.

आणखी वाचा : ‘या’ नव्या स्मार्टफोनने करा DSLR सारखी फोटोग्राफी; लवकरच बाजारपेठेत घालणार धुमाकूळ

Lava Blaze 5G चा कॅमेरा

Lava Blaze 5G मध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे स्टोरेज आणि तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ५० मेगापिक्सलचा AI आहे. फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

Lava Blaze 5G बॅटरी

यात ५,०००mAh ची बॅटरी दिली आहे. Lava Blaze 5G सोबत यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळणार आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. कनेक्टिविटीसाठी पाच ५जी बँड्स शिवाय, ४जी VoLTE, डुअल बँड Wi-Fi आणि ब्लूटूथ v५.१ चा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये टाइप सी चार्जिंग देखील देण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोन २ तास ५० मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

Lava Blaze 5G किंमत

हा स्मार्टफोन तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट अ‌ॅमेझॉन वरून खरेदी करू शकाल. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा हा देशातील सर्वात स्वस्त ५जी फोन आहे.