Smart Tv Discount Offer: सध्याच्या घडीला प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही (Smart TV) हा पाहायला मिळतोच. वजनाला हलके आणि कमी जागा व्यापणारे हे टीव्ही अनेक दमदार फीचर्ससह येतात. या स्मार्ट टीव्हींना Android सपोर्ट असतो. त्यामुळे इंटरनेटद्वारे चालणारे ओटीटी प्लॅटफॉर्म देखील पाहतात येतात. त्यामुळे या टीव्हींना ग्राहकांची विशेष पसंती मिळते. सध्या अशाच एका स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला बंपर आॅफर मिळत आहे. ही स्मार्ट टीव्ही तुम्हाला अर्ध्या किमतीत खरेदी करता येणार आहे. चला तर जाणून घ्या कोणती आहे ही, स्मार्ट टीव्ही व कुठे मिळतेय ही आॅफर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ स्मार्ट टीव्हीवर बंपर आॅफर

तुम्हाला Infinix स्मार्ट टीव्हीबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण, सध्या तुम्हाला त्यावर बंपर डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हीही हा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. तुम्ही फ्लिपकार्टवरून Infinix 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही ऑर्डर करू शकता.

(हे ही वाचा : भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा तब्बल ‘इतका’ पगार, आकडा जाणून थक्क व्हाल!)

किती मिळतेय सूट?

Infinix 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला जाऊ शकतो. या स्मार्ट टीव्हीची १६,९९९ रुपये आहे आणि तुम्ही ५० टक्के डिस्काउंटनंतर ८,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्ड व्यवहारावर १० टक्के सूट मिळू शकते. HDFC क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारावर १० टक्के सूटही मिळत आहे.

एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असल्यास तुम्ही तो फ्लिपकार्टवर परत करू शकता. त्याऐवजी तुम्हाला ७ हजार रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सूट तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीची स्थिती ठीक असेल आणि ती जुन्या स्मार्ट टीव्हीच्या मॉडेलवरही अवलंबून असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infinix 32 inch smart tv can be ordered from flipkart the mrp of this smart tv is rs 16999 and you can buy it for rs 8499 after 50 percent discount pdb
Show comments