भारतात परवडणाऱ्या किमतीत आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे, जो ग्राहक ८,९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनच्या बॅटरीबद्दल कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की, एका चार्जिंगमध्ये हा फोन तब्बल २२ तास ब्रेकशिवाय चालेल. या दरम्यान, यात हिट सारखी कोणतीही अडचण येणार नाही. Infinix Hot 11 2022 हे होल पंच डिस्प्ले डिझाइनसह येते.

हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यांसह येतो, जो ऑक्टा-कोर Unisoc SoC द्वारे समर्थित आहे. हा फोन 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेला आहे. 4G नेटवर्कवर, फोन २२ तासांचा टॉकटाइम बॅकअप देऊ शकतो.

हे स्मार्टफोन्स टक्कर देतील
Infinix Hot 11 गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता. पण त्याची अपग्रेडेड व्हर्जन शुक्रवारी सादर करण्यात आली. Infinix Hot 11 2022 परवडणारी किंमत ऑफर केल्यानंतर अनेक स्मार्टफोनशी स्पर्धा करते. ज्यामध्ये Realme C31, Poco M3 आणि Redmi 10 स्मार्टफोन समाविष्ट आहेत.

किंमत आणि उपलब्धता
भारतात Infinix Hot 11 2022 ची किंमत 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी ८,९९९ रुपये देण्यात आली आहे. हे फक्त एका व्हेरिएंटचं सादरीकरण आहे आणि हा स्मार्टफोन अरोरा ग्रीन, पोलर ब्लॅक, सनसेट गोल्ड कलरमध्ये येतो. २२ एप्रिलपासून फ्लिपकार्टद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. मात्र, ही सुरुवातीची किंमत असून येत्या काळात त्यात बदल केला जाऊ शकतो, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : भेटीला आलाय Oppo A57 5G स्मार्टफोन, 8GB RAM, कमी किमतीत उत्तम फीचर्स, वाचा सविस्तर

गेल्या वर्षी Infinix Hot 11 देखील 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी ८,९९९ रुपये आणि Infinix Hot 11S सोबत १०,९९९ रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता.

स्‍पेसिफिकेशन
Infinix Hot 11 2022 स्मार्टफोन Android 11 वर XOS 7.6 वर चालतो. या फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सेल) IPS डिस्प्ले आहे. हुड अंतर्गत हे ऑक्टा-कोर Unisoc T610 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, 4GB RAM सह जोडलेले आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/2.0 लेन्स अपर्चरसह 13-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेल प्रदान केले आहे.

कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11 a/b/g/n, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे. ऑनबोर्ड सेन्सरबद्दल बोलायचे झाल्यास, यात एक एक्सलेरोमीटर, सभोवतालचा प्रकाश आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे, साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. हे 5,000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंगसह येते.

Story img Loader