Infinix एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. Infinixने भारतामध्ये आपला Infinix Hot 30 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये १२० Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, ६,००० mAh क्षमतेची बॅटरी MediaTek Dimensity 6020 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. याची विक्री, फीचर्स आणि ऑफर्स याबद्दल जाणून घेऊयात.

Infinix Hot 30 5G: स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 30 5G या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळणार आहे. ज्यामध्ये १२० Hz इतका रिफ्रेश रेट आणि ५८० नीट्स पीक ब्राईटनेस ऑफर करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे याला MediaTek Dimensity 6020 चिपसेटचा सपोर्ट आहे. यात ८ जीबी रॅम आणि ८ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम येते. १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले असून ते १ टीबीपर्यंत वाढवता येते. यामध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी IP53 रेटिंग देण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक

हेही वाचा : Amazon Prime Day Sale 2023: ‘या’ आयफोनसह अन्य Apple प्रॉडक्ट्सवर मिळणार दमदार डिस्काउंट, ऑफर्स पहाच

वापरकर्त्यांना या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा हा डिस्प्लेवरील पंच होत कटआउटमध्ये देण्यात आला आहे. रिअर कॅमेरा सेटअप फिल्म, ड्युअल व्हिडिओ, ब्युटी आणि पोर्ट्रेट फीचर्ससह येतो. Infinix Hot 30 मध्ये DTS टेक्नॉलॉजीचे ड्युअल स्पिकर्स दिले आहेत. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित सॉफ्टवेअरवर आधारित Infinix च्या XOS 13 इंटरफेसवर चालतो.

Infinix Hot 30 5G या स्मार्टफोनमध्ये ६,००० mAh क्षमतेची बॅटरी आणि १८W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या फोनचे वजन २१५ ग्रॅम इतके आहे.

Infinix Hot 30: भारतातील किंमत आणि सेल ऑफर्स

Infinix Hot 30 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन अरोरा ब्लू आणि नाइट ब्लॅक या कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध असेल.

Infinix Hot 30 5G हा फोन फ्लिपकार्टवर १८ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सेल आणि ऑफर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास Axix बँकेच्या क्रेडिट कार्डावरून व्यवहार केल्यास खरेदीदारांना १,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.