आजकाल स्मार्टफोन हा प्रत्येकासाठी महत्वाचा झाला आहे. आपली अनेक कामे या स्मार्टफोनच्या मदतीनेच होत असतात. आपण आपल्या बजेटमधील फोन खरेदी करत असताना आपल्याला आवश्यक असणारे फीचर्स त्यामध्ये आहेत की नाहीत हे तपासात तपासतो आणि मगच फोन खरेदी करतो. अनेक कंपन्यांनी या वर्षात आपले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आज आपण Nothing Phone (2) आणि Infinix Hot 30 5G या फोनमधील फीचर्स, किंमत आणि ऑफर्स याबाबतची तुलना पाहणार आहोत.

Infinix Hot 30 5G: स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 30 5G या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळणार आहे. ज्यामध्ये १२० Hz इतका रिफ्रेश रेट आणि ५८० नीट्स पीक ब्राईटनेस ऑफर करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे याला MediaTek Dimensity 6020 चिपसेटचा सपोर्ट आहे. यात ८ जीबी रॅम आणि ८ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम येते. १२८ जीबी स्टोरे देण्यात आले असून ते १ टीबीपर्यंत वाढवता येते. यामध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी IP53 रेटिंग देण्यात आले आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

हेही वाचा : नुकत्याच लॉन्च झालेल्या Nothing Phone (2) आणि iQOO Neo 7 Pro 5G मध्ये कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? फीचर्स, किंमतीमधील फरक बघाच

Nothing Phone (2): स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नथिंग फोन (२) मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा LTPO OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित आहे. यामध्ये कंपनीने १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेंज ऑफर केले आहे. हा फोन ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Infinix Hot 30 5G: कॅमेरा

वापरकर्त्यांना या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा हा डिस्प्लेवरील पंच होत कटआउटमध्ये देण्यात आला आहे. रिअर कॅमेरा सेटअप फिल्म, ड्युअल व्हिडिओ, ब्युटी आणि पोर्ट्रेट फीचर्ससह येतो. Infinix Hot 30 मध्ये DTS टेक्नॉलॉजीचे ड्युअल स्पिकर्स दिले आहेत. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित सॉफ्टवेअरवर आधारित Infinix च्या XOS 13 इंटरफेसवर चालतो.

Infinix Hot 30 5G या स्मार्टफोनमध्ये ६,००० mAh क्षमतेची बॅटरी आणि १८W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या फोनचे वजन २१५ ग्रॅम इतके आहे.

Nothing Phone (2): कॅमेरा

फोटोग्राफीसाठी नथिंग फोन (२) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित NothingOS 2.0 वर चालतो. यात ४,७०० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ४५ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. केवळ २० मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के इतका चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी USB टाईप -सी पोर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, १ हजाराचा डिस्काउंट; Infinix कंपनीकडून ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च

Infinix Hot 30: भारतातील किंमत आणि सेल ऑफर्स

Infinix Hot 30 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन अरोरा ब्लू आणि नाइट ब्लॅक या कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध असेल.

Infinix Hot 30 5G हा फोन फ्लिपकार्टवर १८ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सेल आणि ऑफर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास Axix बँकेच्या क्रेडिट कार्डावरून व्यवहार केल्यास खरेदीदारांना १,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

Nothing Phone (2) : भारतातील किंमत आणि उपलब्धता

Nothing Phone (2) फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे. तसेच १२/२५६ जीबी स्टोरे व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तसेच १२/५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये असेल. फोन (२) अ‍ॅक्सेसरीजमध्ये १,२९९ रुपयांची असणारी केस, ९९९ रुपयांचे स्क्रीन प्रोटेक्टर आणि २,४९९ रुपयांचे पॉवर अ‍ॅडॉप्टर यांचा समावेश आहे. तसेच नाथानं फोन (२) २१ जुलैपासून भारतात Flipkart वर दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उप्लब्ध असणार आहे.

नथिंग फोन (२) आता भारतात प्री-ऑर्डरसाठी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. प्री-ऑर्डर ऑफरमध्ये Axix Bank आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ३,००० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. खरेदीदार फोन (२) ची केस ४९९ रुपये, स्क्रीन प्रोटेक्टर ३९९ रुपयांना, पॉवर अॅडॉप्टर १,४९९ रुपयांना ईअर (स्टिक) ४,२५० रुपयांना आणि ईअर ८,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात.