Infinix ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट केला आहे. जिथून फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. Infinix भारतात २७ मार्च रोजी नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे. कंपनी infinix HOT 30i स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
काय आहेत फीचर्स ?
Infinix HOT 30i च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला ६.६ इंचाचा HD Plus डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९०hz सपोर्ट करणार आहे. मोबाइल फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. तसेच सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी मिळणार आहे.
तसेच हा स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G37 हा प्रोसेसर मिळणार आहे. तसेच पॉवर बटणावर फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळणार आहे. ज्यांना योग्य बजेट रेंजमध्ये स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा झाल्यास हा फोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.
काय आहे किंमत ?
Infinix HOT 30i ha स्मार्टफोन तुम्हाला Black, White आणि Blue या तीन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनच्या किंमतीबद्दल अधिकृतपणे कंपनीने काही सांगितलेले नाही. मात्र या फोनची किंमत साधारणपणे १०,००० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये स्टोरेजलॉन्च केला जाणार आहे. वापरकर्ते या फोनची रॅम १६ जीबी पर्यंत वाढवू शकतात.