ग्राहकांच्या अपेक्षेनुसार Infinix Inbook Y1 Plus हा लॅपटॉप भारतात लॉन्च झाला आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक फीचर्स कंपनीकडून देण्यात आली आहेत. तर आपण या लॅपटॉपची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊयात.
Infinix INBook Y1 Plus चे फिचर्स
Infinix Inbook Y1 Plus मध्ये वापरकर्त्यांना १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळतो. यामध्ये इंटेलचा १०जनरेशन कोर i3-1005G1 हा प्रोसेसर आहे. या नवीन लॅपटॉप ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये २५६ जीबी आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेजचा पर्याय वापरकर्त्यांना मिळणार आहे.
नवीन Infinix लॅपटॉपमध्ये Windows 11 Home उपलब्ध असणार आहे. तसेच यामध्ये २ मेगापिक्सलचा फुलएचडी वेबकॅम आहे. INBook Y1 Plus मध्ये वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ 5.1, एक USB 2.0 पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, एक HDMI 1.4 पोर्ट आणि USB Type-C पोर्ट यासारखी अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आली आहेत.
या लॅपटॉपमध्ये ३.५ मिमी ऑडिओ जॅक, दोन डिजिटल मायक्रोफोन, बॅकलिट कीबोर्ड आणि स्टिरिओ स्पीकर आहेत. या लॅपटॉपला ५० wh बॅटरी येते. याचे चार्जिंग ६५ वॅटच्या चार्जरने केले जाऊ शकते. लॅपटॉपमध्ये १० तासांचा व्हिडीओ प्लेबॅक मिळेल असा कंपनीचा म्हणणे आहे. हा लॅपटॉप ६० मिनिटांत ७० टक्के चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…
Infinix INBook Y1 Plus ची किंमत
तुम्ही Infinix Inbook Y1 Plus हा लॅपटॉप ब्ल्यू, ग्रे आणि सिल्वर या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २९,९९० रुपये इतकी आहे. तर २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असणाऱ्या लॅपटॉपची किंमत ३२,९९० रुपयांना खरेदी करू शकणार आहात. Flipkart हा लॅपटॉप २४ फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. २,००० रुपयांच्या बँक ऑफरसह हा लॅपटॉप तुम्ही २७,९९० रुपयांना खरेदी करू शकणार आहात.