इनफिनिक्स ही स्मार्टफोनचे उत्पादन करणारी कंपनी असून, या कंपनीने आपला नवीन लॅपटॉप लाँच केला आहे. तर या लॅपटॉपचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊ…
इनफिनिक्स ही लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी वाय (Y) सिरीजमध्ये त्यांचा नवीन लॅपटॉप ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. हा लॅपटॉप लवकरच भारतात लाँच होणार आहे. या लॅपटॉपचे नाव ‘इनबुक व्हाय२ प्लस’ (Inbook Y2 Plus) असे आहे. तसेच याची किंमत २७,४९० रुपयांपासून सुरू होते आहे. कंपनी या लॅपटॉपवर उत्कृष्ट ऑफरदेखील देते आहे. ‘इनबुक व्हाय२ प्लस’ लॅपटॉप हा स्लीक आणि लाइटवेट डिझाइनसह तयार करण्यात आला आहे; ज्यामध्ये अगदी बारीक व टिकाऊ मेटल बॉडी आहे. तसेच हा लॅपटॉप अॅल्युमिनियमची रचना आणि रग्ड ब्रश मेटल फिनिशसह तयार केला गेला आहे.
अत्याधुनिक ११व्या जेन इंटेल कोअर प्रोसेसरद्वारे तयार केलेला हा लॅपटॉप संगणकासारखा अनुभव देतो. तसेच स्टोरेजच्या बाबतीत सांगायचे झाल्यास इनबुक व्हाय२ प्लस हा लॅपटॉप पीसीआयई ३.० सह एक टीबीपर्यंत सीसीडी ऑफर करतो. ती ५० डब्ल्यूएच मोठ्या बॅटरीसह सुसज्ज आहे; जी पीडी ३.० तंत्रज्ञानाद्वारे परिपूर्ण आहे. तसेच १० तासांपर्यंत वेब ब्राऊजिंग प्रदान करते. लॅपटॉपमध्ये असणाऱ्या टाईप-सी फास्ट चार्जिंग फीचरमुळे तो काही मिनिटांत ७५ टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो.
हेही वाचा…Vijay Sales: नववर्षानिमित्त ६५ इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सवर सूट ! मुंबईत खास प्रदर्शन सुरू…
लॅपटॉपमध्ये १५.६ इंचांचा डिस्प्ले, ८६ टक्के एसआरजीबी कलर Gamut, तसेच २६० एनआयटीसी ब्राइटनेस आहे. हा लॅपटॉप ग्राहकांना ८२ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशोसह इमर्सिव्ह व्ह्युइंगचा अनुभव प्रदान करतो.अल्ट्रा-क्लीअर फुल एचडी रिझोल्युशन आणि स्टिरीओ सराउंड साउंड ऑफर करणारा ड्युअल स्पीकर या सुविधाही या लॅपटॉपमध्ये असतील. ग्राहकांसाठी हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर काल २७ डिसेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.