Infinix या लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Infinix Zero 30 5G असे लॉन्च झालेल्या स्मार्टफोनचे नाव आहे. Infinix Zero 30 5G हा फोन भारतात Infinix Zero 20 चा उत्तराधिकारी म्हणून सादर करण्यात आला आहे. हा फोन चीनमधील Transsion Holdings च्या मालकीचा ब्रँड आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 SoC चालतो. यामध्ये १४४ Hz रिफ्रेश रेट असलेला पंच होल डिस्प्ले मिळतो. या फोनचे फीचर्स, किंमत, कॅमेरा याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Infinix Zero 30 5G: स्पेसिफिकेशन्स

Infinix Zero 30 5G स्मार्टफोन अँड्रॉइड १३ आधारित XOS १३ वर चालतो. यामध्ये ड्युअल सिम (नॅनो) चा सपोर्ट मिळतो. वापरकर्त्यांना यात ६.७८ इंचाचा फुल एचडी + कर्व्ह AMOLED डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचा ब्राईटनेस पीक हा ९५० नीट्स इतका असणार आहे. हॅंडसेटला दोन्ही बाजुंना कॉर्निंग गोरिला ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे. तसेच डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट ३६०Hz इतका आहे. हूड अंतर्गत एक ऑक्टा कोअर मीडियाटेक Dimensity 8020 SoC आहे. यात १२ जीबी रॅम मिळते. Infinix च्या Memfusion रॅम फीचरसह अतिरिक्त न वापरलेले स्टोरेज वापरून ऑनबोर्ड मेमरी २१ जीबी पर्यंत वाढवता येते.

Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
amaltash movie
सरले सारे तरीही…
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…

हेही वाचा :एलॉन मस्क यांच्या ‘X’ वर लवकरच येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉल फिचर: व्हॉट्सअ‍ॅपला आव्हान?

Infinix Zero 30 5G मध्ये क्वाड LED फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. OIS च्या स्पोर्टसह वापरकर्त्यांना यामध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड शूटर तसेच २ मेगापिक्सलंच सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ड्युअल LED फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फ्रंट कॅमेरा हा ६० फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने ४ के व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतो असा दावा करण्यात आला आहे. तसेच यात २५६ जीबी इतके UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे.

Infinix Zero 30 5G मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, NFC, GPS, USB Type-C पोर्ट, Bluetooth 5.3, आणि Wi-Fi 6 हे फीचर्स मिळतात. तसेच यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. या फोनला ६८ W च्या चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीमुळे केवळ ३० मिनिटांमध्ये फोनची बॅटरी ० ते ८० टक्के चार्ज होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

Infinix Zero 30 5G ची ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत २३,९९९ रुपये तर १२/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २४,९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा ५जी स्मार्टफोन Golden Hour आणि Rome Green या दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. याची डिलिव्हरी ८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा फोन प्री-ऑर्डर करता येणार आहे. AXIX बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २ हजारांचा डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफरचे लिमिट २३,०५० रुपये आहे. तसेच यात नो कॉस्ट ईएमआय हा पर्याय देखील उपलब्ध आहे.

Story img Loader