जगभरात इंस्टाग्रामची मेसेज सेवा ठप्प झाली आहे. मेसेज करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सायंकाळी ५ वाजतापासून ही सेवा ठप्प असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे भारतातही अनेकांना याचा फटका बसला आहे. हजारो वापरकर्त्यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात तक्रार केली आहे.

न्यूज १८ ने डाऊनडिटेक्टरच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळपासून इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांना मेसेज करताना अडचणी येत आहेत. जवळपास पाच हजार वापरकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंडसह भारतातील काही वापरकर्त्यांचा समावेश आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केला आहेत.

TRAI New Rule, Jio, Airtel, Vi customers
TRAI New Rule : Jio, Airtel आणि Vi ग्राहकांचे ‘या’ तारखेपासून वाढणार टेन्शन! OTP बाबतच्या नियमात केला मोठा बदल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kunal Kamra response to CEO Bhavish Aggarwal Diwali celebration video
‘सर्व्हिस सेंटरचा फुटेज दाखवा…’ ओला कंपनीच्या दिवाळी सेलिब्रेशन VIDEO वर कॉमेडियन कुणालची कमेंट; CEO वर साधला निशाणा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा – Jio Diwali Dhamaka Offer : जिओच्या ‘या’ दोन रिचार्जवर मिळणार डिस्काउंट कूपन; ३,३५० रुपयांच्या फायद्यासाठी कूपन कसं मिळवायचं ते बघा

भारतात सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास १५५० तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. तर अमेरिकेत ९०० तसेच इंग्लंडमध्ये २३०० तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. दरम्यान, या मागचं कारण अद्याप अस्पष्ट असून यासंदर्भात इंस्टाग्रामकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा – OpenAI’s First Chief Economist : OpenAIचे पहिले-वहिले मुख्य अर्थतज्ज्ञ! कोण आहेत आरोन चॅटर्जी? जाणून घ्या तीन मुद्द्यांमध्ये

महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे इंस्टाग्राम डाऊन होण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ८ ऑक्टोबर रोजी अशाचप्रकारे इंस्टाग्राम डाऊन झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळीही हजारो वापरकर्ते वैतागले होते. त्यांना ॲपमध्ये प्रवेश करण्यात अडचण येत होती. त्यानंतर #instagramdown हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला होता.