इन्स्टाग्रामवर रील्सची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. फिल्म स्टार, क्रिकेटर्स आणि इतर इन्स्टा सेलिब्रिटी त्यांच्या संपूर्ण टीमसोबत रील बनवतात. पण रील बनवणाऱ्या टीममधील लोकांबद्दल अद्याप काहीही माहिती नाही. अशा परिस्थितीत, रील्स बनवण्यात मदत करणाऱ्या लोकांना श्रेय देण्यासाठी इन्स्टाग्रामने एन्हांस्ड टॅग्स हे फिचर जोडले आहे. या फीचरच्या मदतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या रीलमध्ये संपूर्ण टीमचे नाव नमूद केले जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Enhanced tags या फिचरमुळे हा फायदा मिळेल – इन्स्टाग्राम रीलमध्ये तुमच्या टीमचे नाव नमूद केल्याने तुमच्या फॉलोअर्सना कळेल की तुम्ही रील तयार करण्यासाठी व्यावसायिक टीम वापरता. यासोबतच तुमच्या रील्सची विश्वासार्हताही वाढेल. त्यामुळे इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्सही वाढतील.

लोकांची नावे कोण देऊ शकतील – इन्स्टाग्राम निर्माते त्यांच्या टीम, स्क्रिप्ट रायटर, कंटेंट क्रिएटर, कॅमेरामन, व्हिडीओ एडिटर आणि सोशल मीडिया मॅनेजरची नावे रीलमध्ये नमूद करता येणार आहेत. आतापर्यंत फक्त इन्स्टाग्राम रीलमध्ये अभिनय करणाऱ्या व्यक्तिरेखेबद्दल लोकांना माहिती असायची. परंतु एन्हांस्ड टॅग्जच्या रोलआउटनंतर, या सर्व टीम सदस्यांची नावे इन्स्टाग्राम रीलमध्ये जोडली जाऊ शकतात.

आणखी वाचा : Samsung Galaxy चा दमदार फोन भेटीला येतोय, १०८ MP कॅमेरासह उत्तम फीचर्स, जाणून घ्या

एन्हांस्ड टॅग्ज फिचर्स कसे वापरावे ?

हे फीचर वापरण्यासाठी आधी फक्त इन्स्टाग्राम अॅप ओपन करा
त्यानंतर उजव्या कोपर्‍यात असलेल्या + आयकॉनवर क्लिक करा.
नवीन पोस्ट तयार करा आणि उजव्या कोपऱ्यात उपस्थित असलेल्या नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
त्यानंतर क्रिएटिव्ह एडिटिंग करा आणि नंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
येथे कॅप्शन लिहिल्यानंतर लोकांना टॅग करा वर क्लिक करा.
अॅड टॅग निवडा आणि शोधा, तुमचे योगदानकर्ते निवडा.
नंतर Show Profile Category वर क्लिक करा म्हणजे Creator Category दिसेल.
त्यानंतर Done वर क्लिक करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instagram feature make it easier to create reels and help in increasing followers prp
Show comments