रिल्स, शॉर्ट व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यासाठी इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. छायाचित्रांना आकर्षित करण्यासाठी त्यामध्ये अनेक फील्टर्स आणि इतर फीचर मिळतात. चाहत्यांना आपल्याबाबत अपडेटेड ठेवण्यासाठी सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात. आता इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टाग्रामवर आता तुम्ही पोस्ट शेड्युल करून ठेवू शकता. कंपनीने हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेड्युल फीचर काय करते?

शेड्युल फीचरद्वारे हव्या त्या तारखेला तुमची पोस्ट आपोआप शेअर होते. यासाठी तुम्हाला पोस्ट करण्याची तारीख आणि वेळ आधीच शेड्युल फीचरमध्ये नोंद करावी लागते. नंतर ठरलेल्या तारखेला आपोआप पोस्ट शेअर होते. इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध केले आहे. या फीचरद्वारे युजरला छायाचित्र, पोस्ट कराऊसेल आणि रिल्स इन्टाग्रामवर शेअर होण्याच्या ७५ दिवसांपूर्वी शेड्युल करून ठेवता येतील. या फीचरद्वारे लाइव्ह व्हिडिओ देखील शेड्युल करता येतील. मात्र, हे फीचर प्लाटफॉर्मवर कंटेंट तयार करणाऱ्या निर्मत्यांसाठी मर्यादित आहे. काही कालावधीनंतर इन अ‍ॅप शेड्युलिंग फीचर सर्वांना वापरता येईल.

(१४९९ रुपयांमध्ये घेऊन या ‘हे’ हेडफोन्स, ५० तासांपर्यंतचा मिळतोय प्लेटाईम)

इन्स्टाग्रामवर पोस्ट तयार केल्यानंतर ती शेड्युल करण्यासाठी अडव्हान्स्ड सेटिंग्सवर टॅप करा. त्यानंतर शेड्युलवर क्लिक करा. पोस्ट करण्याची वेळ आणि तारीख टाका. त्यानंतर इन्स्टाग्राम पोस्ट फ्लोवर जा आणि ‘शेड्युल पोस्ट बटनवर’ टॅप करा.