Social Media Influencers Government Guidelines: सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध उत्पादनाचे प्रमोशन करून सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्स लाखो रुपये कमावतात. यात गैर काहीच नाही पण यापुढे हे प्रमोशन करताना जर खालील काही नियमाचे पालन केले नाही तर या इन्फ्ल्यूएंसर्सना ५० लाखांचा दंड भरावा लागू शकतो. सरकारच्या घोषणेनुसार यापुढे सर्व सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्सना कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना आपल्या टॅबवर पेड प्रमोशन, म्हणजेच आपण जाहिरात करत असल्याचा खुलासा करणे अनिवार्य असणार आहे. असे न झाल्यास त्या व्हिडिओला दिशाभूल करणारी जाहिरात समजून त्याचे गंभीर परिणाम संबंधित इन्फ्ल्यूएंसर्सना भोगावे लागू शकतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IANS च्या माहितीनुसार, ग्राहक व्यवहार मंत्रालय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याअंतर्गत, इन्फ्ल्यूएंसर्सनी त्यांच्या फॉलोवर्सना उत्पादनाच्या जाहिरातीसाठी पैसे घेतले असल्यास ते उघड करावे लागेल. असे न केल्यास संबंधित इन्फ्ल्यूएंसर्सच्या विरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) कडे तक्रार केली जाऊ शकते आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

अनेकदा काही सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्स सोशल मीडिया हँडलवर उत्पादनांचा केवळ पैसे घेतले आहेत म्हणून प्रचार करतात पण ते स्वतः त्या उत्पादनांचा वापर करतच नाहीत, इतकंच नव्हे तर त्यांना ते उत्पादन नेमकं काय आहे हे ही माहित नसते. अशावेळी त्यांचे फॉलोवर्स आंधळा विश्वास टाकून ते उत्पादन विकत घेतात यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हेच टाळण्यासाठी सरकारकडून अधिकृत नियम बनवण्यात येणार आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स पुरतेच मर्यादित राहणार नाही तर, हा नियम कलाकार व अन्य सेलिब्रिटींना सुद्धा लागू होणार आज.कोणत्याही प्रकारच्या खोट्या दाव्यांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत.

हे ही वाचा<< ..म्हणून Zudio एवढे स्वस्त कपडे विकतं! वाचून म्हणाल याला बोलतात ‘डोकं’

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्स ज्यांना विशिष्ट ब्रॅंडकडून मोफत उत्पादने मिळतात त्यांना ती मिळवण्यासाठी कर भरावा लागतो. कार, ​​मोबाइल, सौंदर्य प्रसाधने, पोशाख यांसारखे उत्पादन मिळाल्यास आणि ते ठेवण्याचा निर्णय घेतल्यास ते टक्के टीडीएस भरण्यास जबाबदार आहेत. तथापि, जर प्रभावकांनी सेवा वापरल्यानंतर कंपनीला उत्पादन परत केले तर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.