तरुणांमध्ये मेटा कंपनीचं फोटो शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्राम प्रसिद्ध आहे. या माध्यमातून अनेकांना पैसेही कमवता येतात. इन्स्टाग्रामने अधिकृतपणे बॅगेज फीचर जारी केले आहे. इंस्टाग्राम क्रिएटर्स आता त्यांच्या फॉलोअर्सकडून पैसे कमवू शकणार आहेत. इंस्टाग्राम बॅगेजचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्संला लाइव्ह व्हिडिओला आर्थिक मदत देण्याची सुविधा आहे. Instagram बॅगेज वैशिष्ट्य आणले आहे आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निर्मात्यांना त्याचा लाभ घेता येईल. मात्र, यासाठी किमान दहा हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. एकदा बॅगेज घेतले की, लाइव्ह व्हिडिओ दरम्यान टिप्पण्यांसह बॅगेजपण दिसल. बॅगेजच्या मदतीने, क्रिएटर्स आणि फॉलोअर्स यांच्यातील व्यस्तता वाढेल. बॅगेजच्या मदतीने ९० दिवसांसाठी लाइव्ह व्हिडिओचे सबस्क्रिप्शन खरेदी करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इन्स्टाग्राम बॅगेज ही एक प्रकारची सशुल्क सदस्यता सेवा आहे. या बॅगेजच्या मदतीने क्रिएटर्स त्यांच्या फॉलोअर्सकडून पैसे कमवू शकतील. जेव्हा एखादा फॉलोअर्स क्रिेएटर्सचे बॅगेज खरेदी करतो तेव्हा त्याला सुमारे ७३० रुपये द्यावे लागतील. बॅगेजच्या आधारावर, युजर्संना लाइ्ह व्हिडिओ पाहता येतील. इन्स्टाग्रामने २०२० मध्ये प्रथम बॅगेज आणलं होतं, परंतु ते केवळ निवडक क्रिएटर्ससाठी होते. कंटेन्ट क्रिएटर्स Profile > Professional dashboard > Grow your business > Badges for onboarding मध्ये जाऊन अ‍ॅक्टिव्ह करू शकतात.

दुसरीकडे, टेक अ ब्रेक नावाच्या नवीन फिचर्सची चाचणी सुरू केली आहे जेणेकरुन लोकांना अ‍ॅप वापरण्यापासून नियमित ब्रेक घेण्यास मदत होईल आणि वापरकर्त्यांना त्यात व्यस्त राहण्यास प्रोत्साहित केले जाईल. इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळापासून मागणी केलेले टेक अ ब्रेक फीचर वापरकर्त्यांना आठवण करून देईल की त्यांनी प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवला आहे. इन्स्टाग्राम मुलांसाठी हानिकारक असल्याची टीका होत असताना नवीन फिचर्स आलं आहे. अलीकडे, अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हौहानने उघड केले की लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप्स मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात.