इंस्टाग्राम हे मेटा कंपनीच्या मालकीचं सोशल मीडियावरील नावाजलेलं अॅप आहे. मेटा कंपनी हे त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणि फिचर्स आणत असते. आता कंपनीने युजर्ससाठी एक नवं फिचर आणलयं जे खास रिल्ससाठी तयार करण्यात आलंय. या फिचरच्या माध्यमातून रिल्स बनवणाऱ्या युजर्सला चक्क गिफ्ट मिळणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. आता लवकरच इंस्टाग्रामवर गिफ्ट फिचर येणार आहे.
मुंबई ऑफीसमध्ये झालेल्या प्रोडक्ट एज्युकेशन वर्कशॉपमध्ये कंपनीने या विषयी माहिती दिली. या फिचरद्वारे कंपनीकडून क्रिएटर्सला प्रोत्साहित केले जाणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची क्रिएटिव्हीटी पोहचू शकणार आहे.
हेही वाचा : खुशखबर! आता फोनवर करता येणार ChatGpt चा वापर, ‘या’ युजर्ससाठी लॉन्च झाले अॅप
हे फिचर कसं काम करणार?
भारतीय फेसबूक (मेटा) कंपनीचे कंटेट आणि कम्युनिटी पार्टनरशिपचे संचालक पारस शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, या फिचरद्वारे क्रिएटर्सला सोशल मीडियावर प्रोत्साहन देण्यास लक्ष केंद्रीत जाणार आहे. कंपनीकडून या फिचरद्वारे कंटेट क्रिएटर्सला पुढं जाण्यास मदत केली जाणार. इंस्टाग्राम गिफ्ट फिचरच्या माध्यमातून युजर्सला थेट अॅपद्वारे त्यांच्या फॅन्सकडून गिफ्ट मिळणार. स्टार विकत घेऊन फॅन्स किंवा नेटकरी त्यांच्या फेवरेट क्रिएटर्सला गिफ्ट पाठवू शकणार. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रत्येक स्टारसाठी इंस्टाग्राम $.01 इतका कमाईचा वाटा क्रिएटर्सला देणार.
एडिटींग फिचर
हे गिफ्ट फिचर लवकरच येत्या आठवड्यांमध्ये भारतात येणार आहे. यामुळे क्रिएटर्सला एका चांगल्या मार्गाने प्रेक्षकांसोबत जुळून राहण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय इंस्टाग्राम एक नवीन अपडेट जारी करण्याच्या मार्गावर आहे ज्यामध्ये युजर्सला रिल्स एडिटसुद्धा करता येणार. या अपडेटमध्ये युजर्ससाठी स्प्लिट, स्पीड, आणि रिप्लेस हे फिचर असणार आहे. स्प्लिटमुळे तुम्हाला एखादा व्हिडीओच्या दोन वेगवेगळ्या क्लिप्स तयार करता येऊ शकतात. स्पीड फिचरमुळे तुम्ही स्पीड नियंत्रित ठेवू शकता.
रिप्लेस फिचरमुळे तुम्ही एखाद्या क्लिपच्या जागी दुसरी क्लिप कोणत्याही अडथळ्याशिवाय लावू शकता. या आधी कंपनीने पोस्टवर किंवा रिल्सवर GIF कमेंट्सचं फिचर आणलं होतं जे आता सगळीकडे सुरू आहे.