इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्रामचे जगभरात लाखो युजर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवरून फोटो, रील्स, व्हिडीओ असा कंटेन्ट शेअर करता येतो. युजर्सना आकर्षित करण्यासाठी इन्स्टाग्रामकडून सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. लवकरच आणखी एक नवे फीचर इन्स्टाग्रामवर उपलब्ध होणार आहे. या नव्या फीचरच्या माध्यमातून युजर्सना इन्स्टाग्राम प्रोफाइलवर गाणे ॲड करता येणार आहे.
इन्स्टाग्राम प्रोफाइल होणार अधिक आकर्षित
इन्स्टाग्रामकडुन एका नव्या फीचरची महिती देण्यात आली, या फीचरचा वापर करून इन्स्टाग्राम प्रोफाइलवर गाणे ॲड करता येणार आहे. प्रोफाइलमध्ये युजर्सच्या ‘बायो’खाली गाण्याचे फीचर उपलब्ध होईल. सध्या फक्त इन्स्टाग्राम स्टोरीवर गाणे ॲड करण्याचे फीचर उपलब्ध आहे. इंस्टाग्राम ॲपच्या लायब्ररी मधून किंवा स्पोटीफाय सारख्या थर्ड पार्टी ॲपवरून युजर्स गाणी अपलोड करू शकतात. गाण्याचे फीचर उपलब्ध झाल्यावर ते इन्स्टाग्राम प्रोफाइल नक्कीच अधिक आकर्षक होईल.
आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग
सध्या या फीचरवर काम सुरू आहे आणि लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती इन्स्टाग्रामकडुन देण्यात आली. प्रोफाइलवर गाण्याचे फीचर उपलब्ध करणारे पहिले प्लॅटफॉर्म नाही तर २००० मध्ये ‘माय स्पेस’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील असेच फीचर उपलब्ध होते. इन्स्टाग्रामवर हे आकर्षक फीचर कधी रोल आउट होणार याची युजर्स वाट पाहत आहेत.