इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक हे सोशल मीडिया ॲप आज आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाले आहेत. आपण घरबसल्या या ॲपवर तासन् तास वेळ घालवतो किंवा दूरच्या नातेवाइकांशी संवाद साधतो आणि ऑफिसच्या महत्त्वाची कामेसुद्धा करतो. तसेच या ॲपचे सीईओ (CEO), हेड (head) नवनवीन गोष्टी युजर्सठी घेऊन येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे इन्स्टाग्रामवरही एक खास फीचर येणार आहे; ज्याचा तरुण मंडळींपासून ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच उपयोग होणार आहे. काय आहे इन्स्टाग्राम ॲपचे नवे फीचर आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊ.

व्हाट्सॲपप्रमाणे आता इन्स्टाग्राम ॲपवरसुद्धा रीड रिसिप्ट्स (Read Receipts) ऑन (On) ऑफ (Off) करण्याचा पर्याय युजर्सना उपलब्ध होणार आहे. इन्स्टाग्राम ॲप लवकरच हे नवीन फीचर युजर्ससाठी घेऊन येणार आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर (Broadcast Channel) यासंबंधीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्राम ॲप एका फीचरवर काम करीत आहे; ज्यात युजर्स डायरेक्ट मेसेजची (DMs) रिड रिसिप्टस (Read Receipts) बंद करू शकणार आहेत. जेणेकरून इतरांनी पाठवलेला संदेश तुम्ही बघितला आहे की नाही हे समोरच्याला कळणारसुद्धा नाही.

Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Viral video of a woman falling from an escalator due to feeling dizzy
सरकत्या जिन्यांवर चढली अन् करू लागली विचित्र प्रकार, शेवटी दोन माणसं आली अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
small girl stunning dance
‘अरे होगा तुमसे प्यारा कौन’, गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
how to deactivate instagram account
आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद किंवा कायमस्वरुपी Delete कसं करायचं? ‘ही’ सोपी प्रक्रिया जाणून घ्या…
Auto driver written a message on back side of his auto goes viral
रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की वाचून होईल आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

इन्स्टाग्राम ॲपवर हा पर्याय तुम्हाला कुठे दिसेल :

सेटिंग्सवर (settings) क्लिक करून प्रायव्हसी आणि पॉलिसीवर (Privacy and Policy) क्लिक केल्यावर त्यात तुम्हाला एक पर्याय ‘व्हू कॅन सी युअर ॲक्टिव्हिटी’ Who can see your activity) हा पर्याय दिसेल. त्यात रिड रिसिप्टस (Read Receipts) हा पर्याय असेल. हा पर्याय ऑन (On) असेल, तर तुम्ही तो ऑफ (Off) करा म्हणजे समोरच्याने पाठवलेला मेसेज तुम्ही बघितला आहे की नाही हे समोरच्याला अजिबात कळणार नाही.

नव्या फीचरमध्ये काय आहे खास?

इन्स्टाग्रामवर इतरांनी पाठवलेला मेसेज उघडून पाहिलात, तर त्या मेसेजखाली तुम्हाला सीन (Seen) असे लिहिलेले दिसून येते. पण, हा फीचर लाँच झाल्यानंतर तुम्ही रिड रिसिप्टस (Read Receipts) हा पर्याय ऑफ (Off) करू शकता. इतरांनी पाठवलेला मेसेज तुम्ही वाचला आहे की नाही हे समोरच्या व्यक्तीला कळणारसुद्धा नाही ; या खास गोष्टीसाठी हे फीचर अगदीच उपयुक्त आहे.

नवीन फीचर कधीपासून युजर्ससाठी उपलब्ध होईल?

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी हा पर्याय केव्हा आणि कधीपासून युजर्सना उपलब्ध होईल याची माहिती दिलेली नाही. पण, इन्स्टाग्राम ॲपचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर आगामी रिड रिसिप्टस (Read Receipts) फीचरचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यामुळे लवकरच इन्स्टाग्राम हे फिचर घेऊन येणार आहे ; ज्यात इतरांनी पाठवलेला मेसेज तुम्ही वाचला आहे की नाही हे समोरच्या व्यक्तीला कळणारसुद्धा नाही.