सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग लाखो लोक त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी करीत असतात. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबूक, यूट्यूबवर या अॅप्सचा उपयोग करून पैसा आणि प्रसिद्धी दोन्हीही मिळवत असतात. ही बाब लक्षात घेऊन कंपनीसुद्धा युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपण आवर्जून इन्स्टाग्राम अॅपच्या स्टोरी फीचरवर पोस्ट शेअर कारतो. जर तुम्ही इन्स्टाग्रामवर एखादी फोटो स्टोरी शेअर करत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की, तेथे काही नवीन पर्याय (स्टिकर्स) देण्यात आले आहेत. या पर्यायांमध्ये फ्रेम्स (Frames), रिवील (Reveal) आणि कटआउट्स (Cutout) यांचा समावेश आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या स्टिकर्सचा उपयोग कसा करायचा. तर आपण या लेखातून याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
रिवील (Reveal) –
इन्स्टाग्रामने नुकतेच एक नवीन ‘रिव्हल’ स्टिकर जाहीर केले, जे वापरकर्त्यांना हिडन (hidden) स्टोरी पोस्ट करण्यास अनुमती देते. तर या स्टिकर्सचा उपयोग म्हणजे तुम्ही पोस्ट केलेली स्टोरी निवडक युजर्सच्या खात्यावर DM (डायरेक्ट मेसेज) करणे होय.
Reveal स्टिकर वापरण्यासाठी स्टोरी तयार करताना स्टिकर्स चिन्हावर टॅप करा आणि ‘रिव्हल’ स्टिकर निवडा. आता तुम्ही पोस्ट केलेल्या स्टोरीमागे काय असू शकते, याविषयी तुमच्या युजर्सना / फॉलोवर्ससाठी संदेश लिहिण्यासाठी तुम्हाला सूचित केले जाईल. एकदा स्टोरी पोस्ट केल्यानंतर, तुमचे फॉलोवर्स तुमची स्टोरी पाहू शकतात,फक्त तुम्ही त्यांना डीएम केले तरच.
फ्रेम्स (Frames) –
इन्स्टाग्रामने एक नवीन फ्रेम्स स्टिकरदेखील जोडले आहे. हा स्टिकर तुम्हाला फोटो व्हर्च्युअल पोलरॉइडमध्ये बदलू देतो. ते पाहण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे फोन हलवावे लागतील किंवा “शेक टू रिव्हल” बटण दाबावे लागेल. तुम्ही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत असताना एखादा फोटो निवडून त्याला फ्रेम जोडू शकता. तेव्हा ते आपोआप फोटोची वेळ आणि तारीख दर्शवेल, तसेच वापरकर्ते फोटोला कॅप्शनदेखील जोडू शकतात.
नवीन स्टोरी पोस्ट करताना स्टिकर्स चिन्हावर टॅप करा आणि “फ्रेम्स” स्टिकर निवडा. असे केल्याने तुमची फोटो गॅलरी उघडेल, जिथे तुम्ही फ्रेम करू इच्छित असलेला फोटो निवडू शकता.
ॲड युअर म्युझिक (Add Yours Music) –
कंपनी एक नवीन “ॲड युअर म्युझिक” स्टिकरदेखील युजर्सना देते आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या मूडला अनुकूल असे गाणं स्टोरीला ठेवण्यास परवानगी देतो आहे. वापरकर्ते त्यांचे आवडते गाणे शेअर करून ॲड युअर म्युझिक स्टिकरला प्रत्युत्तर देऊ शकतील.
हे स्टिकर वापरण्यासाठी, स्टिकर्स चिन्हावर टॅप करा आणि “ॲड युअर म्युझिक” स्टिकर निवडा. आता, “ॲड म्युझिक” बटणावर टॅप करा आणि इन्स्टाग्राम म्युझिक लायब्ररीमधून तुमचे आवडते गाणे निवडा.
कटआउट (Cutout) –
मेटा मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कटआउट स्टिकरदेखील सादर केले ; जे वापरकर्त्यांना फोटो किंवा व्हिडीओचा एक भाग स्टिकरमध्ये रूपांतर करून देईल; जे तुम्ही स्टोरी किंवा रीलमध्येसुद्धा वापरू शकता. Apple आणि Samsung च्या कटआउट टूल्सप्रमाणे, वापरकर्ते त्यांच्या बोटांनी फोटो किंवा व्हिडीओमधून एखादी वस्तू काढू (Cut) शकतात.
तुम्ही कटआउट स्टिकर वापरता तेव्हा गॅलरी उघडेल, जिथे तुम्हाला फोटो किंवा व्हिडीओ निवडण्यासाठी पर्याय दिला जाईल. त्यानंतर बोटांचा वापर करून फोटो, व्हिडीओमधील एखादा भाग काढून टाका; मग त्याचा आपोआप नवीन स्टिकर तयार होईल.