Instagram rolls out accounts with parental controls : आपल्यातील अनेकांच्या मोबाइलमध्ये इन्स्टाग्राम (Instagram) ॲप आहे. इन्स्टाग्राम ॲपवर रील्स पाहणे आपल्यातील अनेकांना आवडते. पण, या रील्सच्या माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टीसुद्धा शेअर केल्या जातात. तसेच या गोष्टी लहान मुलांच्या मनावर परिणाम करू शकतात. तर याचसंबंधित मेटा प्लॅटफॉर्मने (META) एक निर्णय घेतला आहे.

मेटा प्लॅटफॉर्म नवीन टॅब उघडत आहे. सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावांबद्दलच्या वाढत्या चिंतांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने १८ वर्षांखालील मुलांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटसाठी प्रायव्हसी व पॅरेंटल कंट्रोलचे (पालकांचे नियंत्रण) नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे यापुढे १८ वर्षांखालील सर्व अकाउंट हे “टीन अकाउंट्स” (Teen Accounts) मध्ये रुपांतरित (पोर्ट) केले जातील, असे मंगळवारी सांगण्यात आले आहे.

Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Jessica Alba husband Cash Warren separation
२० वर्षांची साथ अन् ३ मुलं, प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याचा १६ वर्षांचा संसार मोडला?
Zuckerberg ends fact checking on Metas Facebook Instagram
‘Facebook’ आणि ‘Instagram’ मध्ये मोठा बदल; ‘या’ निर्णयामुळे अफवांचे प्रमाण वाढणार का?
This hack might help break your phone addiction in just 6 minutes, increase concentration by 68 percent
पालकांनो अवघ्या ६ मिनिटांत सुटेल मुलांचे मोबाईलचे व्यसन; तर एकाग्रता ६८ टक्क्यांनी वाढेल, डॉक्टरांनी सांगितली ट्रिक
Daughter Made Shirt For Dad
‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

अशा युजर्सना इन्स्टाग्रामवर (Instagram) ते फॉलो करत असलेल्या किंवा आधीपासून कनेक्ट केलेल्या खात्यांद्वारे मेसेज आणि टॅग केले जाऊ शकते. याशिवाय सोशल मीडियावरील सेंसेटिव्ह कंटेन्ट म्हणजे संवेदनशील कन्टेंट ही रिस्ट्रिक्टिव्ह सेटिंगमध्ये बदलली जाईल. तसेच १८ वर्षांखालील युजर्स केवळ पालकांच्या परवानगीने डीफॉल्ट सेटिंग्ज बदलू शकतात. पालकांना त्यांची मुले कोणाशी बोलत आहेत यावर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच इन्स्टाग्रामचा वापर मर्यादित करण्यासाठी सेटिंग्जची एक यादीदेखील मिळेल.

हेही वाचा…Diwali Dhamaka : रिलायन्सची युजर्सना दिवाळी भेट! वर्षभराचे सबस्क्रिप्शन देणार मोफत; तुम्हाला होईल का फायदा?

सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलांमध्ये डिप्रेशन, एंग्जाइटी आणि लर्निंग डिसेबिलिटी अशा समस्या निर्माण होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे. Meta, ByteDance’s TikTok आणि Google चे YouTube मुळे मुले सोशल मीडियावर जास्त ॲडिक्ट होत असतात.

टीन अकाउंट्स

मेटाचे हे पाऊल किशोरवयीन मुलांसाठी तीन वर्षांनंतर उचलण्यात आले आहे. जुलैमध्ये, यू.एस. सिनेटने दोन १. द किड्स ऑनलाइन सेफ्टी ॲक्ट आणि २. द चिल्ड्रन अँड टीन्स ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट ; ही ऑनलाइन सेफ्टी बिल्स जारी केली ;जे सोशल मीडिया कंपन्यांना त्यांचा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांवर कसा परिणाम होतो याची जबाबदारी घेईल. १८ वर्षांखालील इन्स्टाग्राम युजर्सना दररोज ६० मिनिटांनंतर ॲप बंद करण्यासाठी सूचना दिली जाईल. अकाउंट डिफॉल्ट स्लीप मोडसहदेखील येतील, जे रात्रभर नोटिफिकेशन बंद करून ठेवले जाईल. मेटाने सांगितले की, यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि या वर्षाच्या शेवटी युरोपियमध्ये किशोरवयीन युजर्सना ६० दिवसांच्या आत अकाउंट्समध्ये ठेवतील. तसेच जगभरातील किशोरांना जानेवारीमध्ये अकाउंट्स मिळणे सुरू होईल…

Story img Loader