मेटा-मालकीच्या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने एक नवीन प्लेबॅक फीचर लाँच केले आहे. प्लेबॅक फिचरमुळे युजर्स त्यांच्या २०२१ च्या टॉप-१० स्टोरी एकत्र पाहू शकता. यात फोटो आणि व्हिडिओ दोन्हींचा समावेश असेल. यामुळे वर्षभरातील घडामोडींना उजाळा मिळणार आहे. इन्स्टाग्रामने प्लेबॅक व्हिडिओंमध्ये सर्वोत्कृष्ट पोस्टला स्थान दिले आहे. मात्र या व्यतिरिक्त युजर्सला दुसऱ्या पोस्ट निवडायच्या असतील तर निवडू शकतात. जर तुम्हाला प्लेबॅकमधील फोटो-व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही तो एडिट करून डिलीट करू शकता. प्लेबॅक फिचर सध्या सर्व युजर्ससाठी आणले जात आहे आणि पुढील एका आठवड्यापर्यंत ते उपलब्ध होईल.
२०२१ च्या शेवटी इन्स्टाग्रामने आणलेल्या प्लेबॅक फिचरमध्ये मूळ कंटेन्टशी कोणतीही छेडछाड केलेली नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये काही संगीत ठेवले असेल, तर ते प्लेबॅक २०२१ च्या पोस्टमध्ये तेच ठेवले आहे.
दुसरीकडे, इंस्टाग्राम क्रिएटर्स आता त्यांच्या फॉलोअर्सकडून पैसे कमवू शकणार आहेत. इन्स्टाग्राम बॅगेज सशुल्क सदस्यता सेवा सुरु केली आहे. या बॅगेजच्या मदतीने क्रिएटर्स त्यांच्या फॉलोअर्सकडून पैसे कमवू शकतील. जेव्हा एखादा फॉलोअर्स क्रिेएटर्सचे बॅगेज खरेदी करतो तेव्हा त्याला सुमारे ७३० रुपये द्यावे लागतील. बॅगेजच्या आधारावर, युजर्संना लाइ्ह व्हिडिओ पाहता येतील. इन्स्टाग्रामने २०२० मध्ये प्रथम बॅगेज आणलं होतं, परंतु ते केवळ निवडक क्रिएटर्ससाठी होते. कंटेन्ट क्रिएटर्स Profile > Professional dashboard > Grow your business > Badges for onboarding मध्ये जाऊन अॅक्टिव्ह करू शकतात.