Instagram Reels Viewed With a Password : आपल्या दिवसाचा अर्धाअधिक वेळ आता इन्स्टाग्रामचे रील्स पाहण्यात जातो. सकाळी ऑफिसला पोहोचेपर्यंत आणि रात्री झोप लागेपर्यंत आपण रील्स स्क्रोल करीत असतो. आपल्या जीवनात जशा गोष्टी घडत असतात, तसेच हुबेहूब कन्टेन्ट काही क्रिएटर्स अगदी आकर्षक पद्धतीने बनवत असतात की एक रील बघून आपले मन कधीच भरत नाही. पण, जर एखादा रील बघताना तुम्हाला कोड किंवा पासवर्ड टाकायला सांगितला तर तुम्ही रील बघणे सोडून द्याल का? कारण – इन्स्टाग्रामचे नवीन फीचर रील बघण्यापूर्वी तुमची परीक्षा घेणार आहे एवढे तर नक्कीच…
इन्स्टाग्राम लवकरच तुम्हाला असे रील्स दाखवेल जे लॉक असतील आणि त्यांना अनलॉक करण्यासाठी पासवर्ड किंवा एखादा कोड टाकावा लागेल. मेटाच्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हे लॉक केलेले शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ निर्मात्यांना त्यांच्या कंटेंटमधून पैसे कमविण्याचा नवीन प्रयत्न आहे. पण, तज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे युजर्स आणखीन इंटरेस्ट सुद्धा दाखवू शकतात किंवा युजर्स कमी होऊ शकतात.
TechCrunch नुसार, इन्स्टाग्राम सध्या अशा रील्सची चाचणी करत आहे जे शर्ट व्हिडिओ स्क्रोल करताना लॉक केलेले दिसतील. युजर्सना या रील्सना एका हिंट किंवा संकेतने अनलॉक करावे लागेल. उदाहरणार्थ – “माझ्या श्वानाचे नाव” किंवा “माझा वाढदिवस” हे अनेक हिंट असू शकतात जे युर्जसना रील्स अनलॉक करण्यासाठी “एंटर सीक्रेट कोड” टाकण्यास सांगेल.
TechCrunch ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये एक अस्पष्ट रील दिसत आहे ज्यावर “Unlock this reel from design” असे लिहिलेले आहे. युजर्सना या मजकुराच्या अगदी खाली “hint -1st # in the caption’ अशी हिंट दिली जाईल. त्याच्याखाली “Enter secret code” असे लिहिलेले असेल. त्यावर टॅप केल्याने एक बॉक्स उघडतो जिथे युजर्स रील अनलॉक करण्यासाठी हिंटमधून घेतलेला गुप्त कोड एंटर करू शकतात.
पासवर्ड टाकून रील बघण्याची नवीन कल्पना इन्स्टाग्रामवर एंगेजमेंट वाढवू शकणारी असली तरीही त्यात एक तोटा सुद्धा आहे. इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे लोकप्रिय झालेला रील हा फीचर लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय बघायला आवडतो. त्यामुळे कोड वा पासवर्ड टाकण्याचे हे नवीन फीचर आल्यावर इन्टाग्राम युजर्सची प्रतिक्रिया काय असेल हे आता वेळच सांगेल