3 Essential Instagram Settings : अनेक जण दरदिवशी सोशल मीडियावर त्याच्या अकाउंटवरून फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतात पण अनेकदा त्या फोटोंवर किंवा व्हिडीओवर मनाप्रमाणे लाइक्स, व्ह्यूज येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी तीन सेटिंग्ज करण्यास या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत. त्या सेटिंग्ज कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (never share photo or video on Instagram without turning ON these 3 settings)
‘या’ तीन Settings केल्याशिवाय Instagram वर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करू नका
या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
या तीन सेटिंग्ज केल्याशिवाय इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करू नये.
१. सेटिंग्ज आणि अक्टिव्हिटीमध्ये जा. त्यानंतर क्रॉसपोस्टिंगवर क्लिक करा. त्यानंतर ‘Recommend reels on Facebook’ ऑन करा. त्यानंतर इन्स्टाग्रामवरील पोस्ट, स्टोरी आणि रील्स फेसबूकवर शेअर करण्याचे ऑप्शन ऑन करा.
२. मीडिया क्वालीटी या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल.त्यापैकी पहिले use less mobile data आणि तिसरे Disable HDR Video playback पर्याय ऑफ करा.
३. एडिट प्रोफाइलमध्ये जा आणि ‘Show account suggestions on profile’ हे सजेशन अकाउंट ऑप्शन ऑन करा
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
officialpwnkumar या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या तीन सेटिंग्जशिवाय इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ कधीही शेअर करू नका.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली.” तर एका युजरने लिहिलेय, “हे सेटिंग्ज केल्यानंतर मला मोठा बदल जाणवला. खूप खूप आभार” आणखी एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद इतकी महत्त्वाची माहिती शेअर केल्याबद्दल.” अनेक युजर्सनी चांगली माहिती शेअर केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
पवन कुमार हा त्याच्या officialpwnkumarया इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवनवीन माहिती, ट्रिक सांगतो. सोशल मीडियावर हजारो लोक त्याला फॉलो करतात. त्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक, कमेंट्चा वर्षाव करतात.