आपण दररोज सोशल मीडियाचा वापर करीत असतो. त्यामध्ये फोटो, मीम्स, रील्स बघण्यासाठी खरे तर इन्स्टाग्राम या माध्यमाचा सर्वाधिक वापर केला जातो. असे असले तरीही मेटाच्या मालकीच्या असणाऱ्या इन्स्टाग्राम या ॲपनेच सर्वांत निरुपयोगी ॲपचा किताब जिंकल्याचे, टीआरजी डाटा सेंटर्सच्या [TRG Data Centers] एका अभ्यासातून दिसून आले आहे. त्यानुसार देशातील बहुतांश वापरकर्त्यांच्या मते, इन्स्टाग्राम हे एक उपयोगी नसणारे ॲप आहे. त्यासोबत केवळ अमेरिकन वापरकर्त्यांनादेखील मेटाच्या कोणत्याही माध्यमांचा वापर करण्यात कोणताच रस नसल्याचे समजते.

या अभ्यासानुसार, ‘हाऊ टू डिलीट माय इन्स्टाग्राम अकाउंट’ म्हणजेच माझे इन्टाग्राम अकाउंट कसे डिलीट करावे हा प्रश्न या वर्षात दर महिन्याला जवळपास १,०२,००० वेळा सर्च केले गेले होते, असे समोर आले आहे. परंतु, इतके प्रसिद्ध ॲप असूनही लोकांना ते डिलीट का करावेसे वाटत असेल, असाही प्रश्न निर्माण होत आहे

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
असा मित्र नशिबाने भेटतो! ‘तो’ अचानक छतावरून खाली कोसळला अन्…, वाचवण्यासाठी मित्राने केली धडपड, पाहा थक्क करणारा VIDEO

हेही वाचा : गूगलच्या ‘Near me फीचरचा वापर करून मुलींनी सर्वाधिक ‘ही’ जागा शोधली; पाहा टॉप १० जागांची यादी…

समजून घ्या इन्स्टाग्राम डिलीट करण्याचे कारण

इन्स्टाग्राममध्ये सतत होणारे बदल हे याचे कारण असल्याचे समोर येते. ‘इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करण्याचा जो मुख्य उद्देश होता, त्यामध्ये आता सातत्याने बदल केला गेला आहे. हे ॲप सध्या इन्फ्ल्यूएन्सरना त्यांचे करिअर घडवण्याचे एक माध्यम बनले आहे. त्यामुळे त्यांच्या फीडवरील उत्पादनांच्या जाहिरातींचे प्रमाण जास्त झाले असल्याने वापरकर्त्यांवर त्याचा परिणाम होत असल्याचे’ या अभ्यासातून सांगितले गेले आहे.

सध्या इन्स्टाग्राम हे ॲप वापरणाऱ्या लोकांची संख्या ही दोन अब्ज [२ बिलियन] आहे. मात्र, वापरकर्त्यांना यापुढेही हे ॲप डिलीट करावेसे वाटत असेल, तर साधारण हे आकडे वर्षभरात नक्कीच बदलू शकतात.

अजून कोणते ॲप्स वापरकर्त्यांना नकोसे झाले आहेत?

जगभरात निरुपयोगी किंवा नको असणाऱ्या ॲप्समध्ये स्नॅपचॅटने दुसरा क्रमांक पटकावला आहे. १,२८,५०० वापरकर्त्यांना हे ॲप डिलीट करावेसे वाटत आहे.
त्यापाठोपाठ एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरचा तिसरा नंबर लागतो.
टेलिग्राम चौथ्या, तर पुन्हा एकदा मेटाच्या फेसबुकचे नाव आपल्याला पाचव्या स्थानावर पाहायला मिळते.

हेही वाचा : हे इयरफोन वापरताना सगळ्यांची नजर तुमच्यावरच राहील! पण आधी पाहा ‘लुईस व्हिटोन’ वायरलेसची किंमत….

शेवटी टिकटॉक सहाव्या स्थानावर आहे. यूट्युब सातव्या, व्हॉट्सॲप आठव्या व व्हीचॅट नवव्या जागी असल्याचे ‘टीआरजी डाटा सेंटर्स’च्या अभ्यासावरून समजते.

Story img Loader