Instagram Allow Users To Add 20 Songs To A Single Reel: इन्स्टाग्राम रील फीचर जेव्हापासून आलं आहे तेव्हापासून ते तरुण मंडळींचं आवडतं फीचर ठरलं आहे. अगदी आईला एखादी रेसिपी हवी असेल किंवा मित्रांना एखादं फिरण्याचं ठिकाण सुचवायचं असेल, तर फक्त रील व्हिडिओ शेअरवर क्लिक करून हे काम सोपं होऊन जातं. पण, या रील्सना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम चित्रीकरण, कन्टेन्टशिवाय गाण्याचंही असते. त्यामुळे रील बनविणाऱ्याला अगदी उत्तम गाणं निवडावं लागतं. तर आता इन्स्टाग्राम रील्स बनविणाऱ्यांसाठी एक खास अपडेट घेऊन येत आहे. आता तुम्ही रीलमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त गाणी जोडू शकणार आहात.

हो तुम्ही बरोबर वाचलंत… इन्स्टाग्रामने (Instagram ) आता ते शक्य केलं आहे. आजपासून इन्स्टाग्राम त्याच्या भारतीय वापरकर्त्यांना एका रीलमध्ये २० ऑडिओ ट्रॅक जोडण्याची परवानगी देत आहे. विशेष म्हणजे इन्फ्ल्यूएन्सर, कन्टेन्ट क्रिएटर यांनी बनवलेलं हे ऑडिओ ट्रॅक इतर युजर्स सेव्ह करून बिनधास्त वापरू शकणार आहेत. नवीन मल्टी ऑडिओ ट्रॅक फीचर्ससह वापरकर्ते आता त्यांच्या रीलमध्ये एकापेक्षा अधिक ऑडिओ ट्रॅक जोडू शकतात आणि या प्रक्रियेदरम्यान मजकूर, स्टिकर्स व व्हिडीओ क्लिप आदी रीलमध्ये एडिट करू शकतात. त्यामुळे युजर योग्य क्लिपसह योग्य ट्रॅक जोडून रील अधिक आकर्षित करू शकतात.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

हेही वाचा…Reliance Jio vs Airtel vs Vodafone Idea: एकाच रिचार्जमध्ये दोन्ही गोष्टींचा लाभ; पाहा तिन्ही कंपन्यांचे ओटीटी सबस्क्रिप्शनचे प्लॅन्स

पोस्ट नक्की बघा…

इन्स्टाग्रामचे हेड ॲडम मोसेरी यांनी ही बातमी शेअर करताना सांगितले, “आजपासून तुम्ही एका रीलमध्ये २० ऑडिओ ट्रॅक जोडू शकता; ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कन्टेन्टना अधिक स्वातंत्र्य दिलं जाईल. तुम्ही तुमचा ऑडिओ इन्स्टाग्राममध्ये एडिट करताना मजकूर, स्टिकर्स आणि क्लिपदेखील जोडू शकता. एकदा वापरून पाहा आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कळवा”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

एका रीलमध्ये २० ऑडिओ ट्रॅक :

एका रीलमध्ये २० पर्यंत ऑडिओ ट्रॅक जोडणं म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडीओचे वेगवेगळे भाग, वेगवेगळ्या ऑडिओसह जोडू शकता आणि तुमची रील अधिक मनोरंजक, मजेदार बनवू शकता. तसेच हे फीचर भारतात प्रथम लाँच करणं हा एक स्मार्ट प्लॅन आहे. कारण- येथे बरेच क्रिएटिव्ह इन्स्टाग्राम युजर्स आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम त्यांच्या भारतीय प्रेक्षकांना महत्त्व देणं आणि त्यांना नवीन, रोमांचक साधनं देऊ इच्छित आहे. तर तुम्हीसुद्धा हे रील वापरून पाहा आणि तुमचा अनुभव कसा होता ते आम्हाला सांगा.

Story img Loader