ट्रोलिंग ही एक विकृती आहे. या प्रकारात मोठया प्रमाणावर ट्रोलर्स खोटया नावाने वावरतात. म्हणूनच की काय, कोण, कुठं, काय टोचून बोलेल, याचा काही नेम नाही. या माध्यमात नको ते बोललं जातं असल्यामुळे अखेर समाजमन खराब होतं. अनेकांची बदनामी होते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत इंस्टाग्रामनं नेटकऱ्यांना लगाम लावलीय. यापुढं इंस्टाग्राम आक्षेपार्ह विधानं, शिवीगाळ आणि ट्रोलिंग असलेला कंटेंट प्रदर्शित करणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगभरात इंस्टाग्रामचे फॉलोअर्स मोठया प्रमाणावर आहेत. याठीकाणी युवक वर्ग खूप अॅक्टीव असतो. इंस्टाग्रामच्या अनोख्या फीचर्समुळे आणि यूजर फ्रेंडली इंटरफेसमुळे यूजर्स त्याकडे आकर्षित होतात. इंस्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांना सुविधा देण्यासाठी वेळोवेळी नवीन फीचर्स देत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये, जगभरात प्रायव्हसीबद्दल नवीन चर्चा सुरू असताना अनेक वापरकर्ते त्यांच्या प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षिततेबद्दल खूप संवेदनशील दिसून येतात. युजर कुठल्याही ट्रोलिंग कंटेटला याठीकाणी पसंती देत नाही. हेच ओळखून इंस्टाग्रामने एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे इंस्टाग्रामवर शिवीगाळ आणि ट्रोलिंग असलेला कंटेंट दिसणार नाही.

आणखी वाचा : खुशखबर: आता YouTube वर 4K व्हिडीओ मोफत पाहता येणार; कंपनीने केली अधिकृत घोषणा

युजरला दिले आहे ‘हे’ अधिकार

इंस्टाग्रामने म्हटले आहे की, सर्व इंस्टाग्राम वापरकर्ते आता एखाद्या व्यक्तीचे सर्व विद्यमान सोशल मीडिया खाते ब्लॉक करू शकतील. इंस्टाग्रामने मागील वर्षीच युजर्सचे अकाउंट ब्लॉक करण्याची सुविधा दिली होती, ज्यामध्ये जर यूजरने त्याच वेळी नवीन अकाउंट बनवले तर तेही ब्लॉक होते. मात्र, आता आक्षेपार्ह विधानं किवा ट्रोलिंगची भाषा असलेला कंटेट आटोमॅटीक ब्लॉक करण्याची त्यांनी माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instagram will not display trolling content pdb