Video Editing App: अलीकडे रील बनवणे किंवा युट्युबचे व्हिडीओ बनवणे ही केवळ हौस म्हणून नव्हे तर करिअर म्हणून पाहिला जाणारा पर्याय आहे. यात जरा प्रश्न पडेल असे कॉन्टेन्ट बनवणारी मंडळी अधिक असली काहीजण खरोखरच उत्तम व्हिडीओ बनवून नाम कमावतात. हे व्हिडीओ एडिट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला मोठमोठ्या सॉफ्टवेअरची गरज नाही तरी गुगल प्ले स्टोअरवरील काही ऍप वापरून अँड्रॉइड फोनवर सुद्धा आपण व्हिडीओ एडिट करू शकता. हे ऍप इन्स्टॉल केल्यावर आपण सामान्य एडिटिंग मोफत तर बेसिक शुल्क भरून ऍडव्हान्स एडिटिंग करू शकता. असे कोणते ऍप सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत हे जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

FilmoraGo

फिल्मोरा गो अँड्रॉइडमध्ये उपलब्ध दमदार एडिटर ऍप आहे. मुख्य गोष्ट म्हणजे फिल्मोरा गो मध्ये व्हिडीओवर कोणताच वॉटरमार्क येत नाही. यातील इफेक्टमुळे व्हिडीओची गुणवत्ता उत्तम सुधारते. तुम्ही हे एडिट केलेले व्हिडीओ थेट युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सऍप वर शेअर करता येऊ शकतो. प्ले स्टोअर वर फिल्मोरा गो ला ४. ६ रेटिंग आहे.

मुख्य फीचर्स

  • Insta व फेसबुक व्हिडीओ थेट शेअरिंग
  • परवानगी असलेल्या गाण्यांची मोठी लायब्ररी
  • व्हिडिओत लीप सिंक करता येते
  • एकाच व्हिडीओमध्ये मल्टीपल फास्ट किंवा स्लो मोशन मोड
  • फिल्मोरा गोमध्ये जर्मन, इटालियन, तुर्किश, जपानी, कोरियन, रशियन, फ्रेंच सर्व भाषांना समर्थन आहे.

KineMaster

काइनमास्टर हा एक अँड्रॉइडवर उपलब्ध ऍप आहे. यात ट्रांजिशन, इफेक्ट्स, व्हिडीओ , इमेज सह २५०० हुन अधिक पर्याय डाउनलोड कि करून वापरता येऊ शकतात. EQ presets, ducking आणि volume envelope tools मुळे काइनमास्टर एक उत्तम ऍप ठरतो. प्रीमियम सब्सक्रिप्शनसह युजर्स 4K गुणवत्तेचे व्हिडीओ अनलिमिटेड एक्स्पोर्ट केले जाऊ शकतात. काइनमास्टरला प्ले स्टोअर वर 4.4 रेटिंग आहे.

मुख्य फीचर्स

  • इनबिल्ट ग्राफिक्स, फॉन्ट्स, स्टिकर्स, ट्रांजिशन, असे फीचर्स उपलब्ध आहेत
  • वॉइस ओवर, वॉइस चार्जर, साउंड इफेक्ट्स, बॅकग्राउंड म्यूजिक फीचर्स
  • ब्लेंडींग मोड उपलब्ध
  • युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍपवर शेअरिंग उपलब्ध

InShot

InShot एक पॉवरफुल ऍप असून यावर एडिटिंग अत्यंत वेगाने होते. यात ट्रिम, कट व्हिडीओ/ मूव्ही, स्टिकर्स अँड ग्लिच इफेक्ट आणि ब्लर बॅकग्राउंड असे विविध फीचर उपलब्ध आहेत. यावरून तुम्ही थेट युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍपवर व्हिडीओ थेट शेअर करू शकतात. InShot ला प्ले स्टोअरवर 4.8 रेटिंग आहे.

PowerDirector

पॉवर डिरेक्टर हा अँड्रॉइड ऍप व्हिडीओ एडिटिंगसाठी उत्तम ठरतो. याच्या मदतीने 4K गुणवत्तेचे व्हिडीओ तयार करता येऊ शकतात. मल्टी-टाइमलाइन फीचरसह व्हिडीओ एडिटिंग हा पर्याय वापरणे जलद होते. युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍपवर तुम्ही हे व्हिडीओ शेअर करू शकता. PowerDirector ला प्ले स्टोअर वर 4.5 रेटिंग आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instagram youtube video editing without watermark kinemaster fimora go inshot features svs