Instagram Text Based App Leaked Images: इन्स्टाग्राम त्याच्या नव्या Text-Based अ‍ॅपवर मागील काही महिन्यांपासून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे अ‍ॅप लॉन्च झाल्यानंतर ट्विटरला आव्हान देईल असे लोक म्हणत आहेत. ही माहिती खरी ठरवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन इन्स्टाग्रामचे नवीन अ‍ॅप हे कसे दिसेल, कसे काम करेल किंवा या अ‍ॅपचा इंटरफेस कसा असेल याचा अंदाज लोक लावत आहेत. एकूणच या फोटोवरुन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटसमोर मेटामुळे मोठे आव्हान निर्माण होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लीक झालेली स्लाइड ही P92/ बार्सिलोना या सांकेतिक नावाने डब केलेली दिसते. The Verse या अमेरिकन वेबसाइडच्या अहवालानुसार, या नव्या अ‍ॅपमध्ये साइन इन करण्यासाठी इन्स्टाग्राम यूजरनेम आणि पासवर्ड वापरता येईल. यूजरनेम व्यतिरिक्त फॉलोअर्स, हॅन्डल, बायो तसेच व्हेरिफिकेशन इन्स्टाग्रामच्या अ‍ॅपवरुन ट्रान्सफर केले जाईल. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास या अ‍ॅपमध्ये यूजर्सना इन्स्टाग्रामप्रमाणे फीड, त्याच्याशी संलग्न असलेली लिंक, फोटो, व्हिडीओ यांसह ५०० कॅटेक्टर्सपर्यंतचा मजकूर पोस्ट करण्याची मुभा मिळणार आहे.

आणखी वाचा – मंदीमध्ये आणखी एका मोठ्या कंपनीमध्ये होणार कर्मचाऱ्यांची कपात; पगारवाढीच्या जुन्या निर्णयालाही दिली स्थगिती

लीक झालेल्या फोटोमध्ये या अ‍ॅपच्या कार्यक्षमतेबाबतची माहिती देण्यात आली आहे. उदा. यामध्ये टेक्स तयार करुन अटॅच करण्यासाठी लिंक्स तयार करणे आणि त्यामार्फत ऑडियन्स/ ग्राहकवर्ग यांपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे. टेक्स म्हणजेच मजकूरासह फोटो, व्हिडीओचाही यामध्ये वापर करता येणार आहे. फोटोवरील स्लाइडवरुन या अ‍ॅपवर जलदगतीने काम सुरु असल्याचे लक्षात येते. तसेच थोड्याच दिवसात ते लॉन्च केले जाऊ शकते असेही लोक म्हणत आहेत.