भारतामध्ये मागील काही महिन्यांपासून 5G नेटवर्क सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यावर भर दिला जात आहे. शासनासह विविध टेलिकॉम कंपन्या यावर काम करत आहेत. 5G नेटवर्क सुविधा जलदगतीने रोलआऊट होत असल्याने देशातील इंटरनेटचा वेग वाढल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानावर पोहचला आहे. ओकलाच्या अहवालानुसार, स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारत मार्च महिन्यात ६४ व्या क्रमांकावर होता. एप्रिल महिन्यामध्ये आपला देश ६० व्या क्रमांकावर आहे. भारताने या यादीमध्ये रशिया, अर्जेंटिनासारख्या राष्ट्रांना मागे टाकले आहे.

या अहवालानुसार, एप्रिल २०२३ मध्ये भारतात मोबाइल डेटा स्पीडमध्ये तब्बल ११५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यामध्ये 36.35 Mbps सरासरी मोबाइल डाउनलोड स्पीडची नोंद ओकलाद्वारे करण्यात आली. मार्चमध्ये इंटरनेटचा स्पीड 33.30 Mbps इतका होता. तसेच मार्च २०२३ मध्ये मेडन फिक्स्ड डाऊनलोड स्पीड हा 50.71 Mbps होता. तो एप्रिलमध्ये वाढून 51.12 Mbps पर्यंत पोहोचला आहे.

Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Jodhapur Ward Boy Viral Video
धक्कादायक! टेक्निशियन रजेवर असल्याने वॉर्डबॉयकडून ईसीजी चाचणी; कुटुंबीयांनी अडवताच म्हणाला…, पाहा VIDEO
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
suraj chavan bhaubeej video
भाऊबीजेला सूरज चव्हाणच्या बहिणी झाल्या भावूक, आई- वडिलांची आठवण काढत म्हणाल्या, “भावामुळे आज सोन्यासारखे…’ VIDEO व्हायरल
senior scams increasing
फसवे फोन कॉल ते ऑनलाइन हस्टलिंग; आजी-आजोबांच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले; कारण काय? संरक्षणात्मक उपाय काय?
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

भारताने स्थिर ब्रॉडबॅंड गतीमध्ये सुधारणा केल्याचे ओकला अहवाल दर्शवतो. आपला देश या एप्रिलमध्ये यादीमध्ये ८४ व्या क्रमांकावरुन ८३ वर पोहोचला आहे. ओकला स्पीडटेस्ट ग्लोबस इंडेक्सनुसार, ग्लोबल मेडन मोबाइल स्पीडच्या क्रमवारीत कतार हा देश पहिल्या स्थानावर आहे. ग्लोबल फिक्स्ड मेडन स्पीडच्या यादीमध्ये सिंगापूरचा क्रमांक पहिला लागतो. ओकलाद्वारे स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स दर महिन्याला जगभरातील मोबाइल आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड यांची क्रमवारी लावली जाते. यासाठीचा डेटा प्रत्येक महिन्याला स्पीडटेस्ट वापरुन इंटरनेट कार्यक्षमतेच्या चाचण्यांमार्फत मिळवला जातो.

आणखी वाचा – Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फक्त ७५ रुपयांमध्ये मिळेल अनलिमिडटेड कॉलिंग, डेटा आणि कित्येक फायदे

Vi कंपनी गेल्या वर्षभरात ग्राहक गमावत असल्याचे ओकलाच्या अहवालात दिसून आले. ऑक्टोबर २०२२ मध्ये 5G सेवा लॉन्च केल्यानंतर डिस्कनेक्शनचे प्रमाण वाढत गेले. 5G नेटवर्क लॉन्च करण्यात ऑपरेटर्स असक्षम असल्याने यूजर्स दूर गेल्याची माहिती समोर आली. या कंपनीचे ग्राहक जिओ (१.८८ टक्के) आणि एअरटेल (१.३२ टक्के) यांच्याकडे वळले आहेत. जिओने एअरटेल आणि व्ही इंडिया यांचे जवळपास १.३ टक्के ग्राहक मिळवले आहेत. या तुलनेमध्ये एअरटेलचा जिओच्या ०.५३ टक्के ग्राहकांना आपल्याकडे वळण्यात यश आले आहे. तर व्ही इंडियाकडे जिओ ०.६३ टक्के ग्राहक आले आहेत.