टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी कार, इंटरनेट आणि स्पेसमध्ये आपला पराक्रम दाखवला आहे. आता इलॉन मस्कने रोबोट लाँच केला आहे. हा कोणताही सामान्य रोबो नसून तो ह्युमनॉइड आहे. इलॉन मस्क यांनी शुक्रवारी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याच्या ‘AI Day’ या कार्यक्रमात त्यांचा बहुचर्चित मानवीय रोबोट ‘ऑप्टिमस’ प्रदर्शित केला. हा रोबोट अद्याप पूर्णपणे तयार झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिशय सक्षम रोबोट
इलॉन मस्क यांनी निदर्शनास आणून दिले की, सध्याच्या ह्युमनॉइड रोबोट्समध्ये मेंदू आणि समस्या स्वतःच सोडवण्याची क्षमता नाही. याउलट, ऑप्टिमस हा एक ‘अत्यंत सक्षम रोबोट’ असेल जो टेस्ला लाखोंमध्ये तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
मस्क म्हणाले की, टेस्ला नक्कीच जगातील सर्वात मोठी रोबोट कंपनी आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये आपल्या रोबोटसाठी एक प्रोटोटाइपही विकसित केला आहे. कार्यक्रमादरम्यान त्यांनी कॅलिफोर्निया प्लांटमधील प्रोडक्शन स्टेशनवर झाडांना पाणी घालणे, बॉक्स वाहून नेणे आणि मेटल बार उचलणे यांसारखी साधी कामे करतानाचा रोबोटचा व्हिडीओ देखील दाखवला.
आणखी वाचा : 5G Launch In India: एअरटेल भारतात 5G सेवा सुरू करणारी पहिली कंपनी! आजपासून आठ शहरात सेवा मिळणार…
मस्क यांच्यानुसार, त्यांचा हा रोबोट कारच्या तुलनेत या जगाला अधिक चांगले बनवण्यास मदत करेल. हा रोबोट ती सर्व कामे करेल, जी एखादी व्यक्ती करू इच्छित नाही. या कार्यक्रमात टेस्लाने त्याच्या दीर्घ-विलंबित स्व-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावर देखील चर्चा केली. मस्कने म्हटले आहे की, टेस्ला या वर्षी संपूर्ण स्व-ड्रायव्हिंगचे आपले उद्दिष्ट साध्य करेल आणि २०२४ पर्यंत स्टीयरिंग व्हील किंवा पेडलशिवाय रोबोटिक टॅक्सींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करेल.
किंमत
या ह्युमनॉइड रोबोट ‘ऑप्टिमस’ची किंमत २० हजार डॉलर्स पेक्षाही कमी असेल, असेही मस्क यांनी सांगितले.