काल रात्री Apple चा WWDC इव्हेंट पार पडला. सीईओ टीम कूक यांनी या अनेक प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे. नवीन iOS सॉफ्टवेअरपासून ते कंपनीने आपला पहिला रिऍलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. आता iOS 17 सह, Apple ने खूप नवीन फीचर्स सादर केलेली नाहीत. मात्र iOS १६ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनीने iOS 17अपडेट मिळू शकते अशा आयफोन्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये तीन लोकप्रिय आयफोनच्या समावेश नाही आहे.
Apple कंपनीने जाहीर केलेल्या अधिकृत यादीनुसार, iPhone Xs आणि नंतरच्या मॉडेल्सना कंपनी iOS 17 अपडेट देणार आहे. मात्र तीन असे आयफोन आहेत ज्यांना हे अपडेट मिळणार नाही आहे. iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 Plus या तीन फोनचा अपडेट न मिळणाऱ्या यादीमध्ये समावेश आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.
प्रत्येक वर्षी हे असेच घडत असते. Apple ने नवीन अपडेटमधून काही फोन वगळले. Apple कंपनी डिव्हाईस रिलीज झाल्यानंतर ५ वर्षांपर्यंत नवीन iOS अपडेटचा सपोर्ट देते. iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 Plus हे फोन २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. सध्या, Apple ने iOS 17 बीटा अपडेट रिलीज केले आहे. तर स्टेबल अपडेट या वर्षाच्या शेवटीआणले जाणार आहे. आता जे या अपडेटसाठी पात्र असलेले जे फोन आहे त्याबद्दल जाऊन घेऊयात.कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, Phone Xs नंतरच्या सर्व मॉडेल्सना iOS 17 अपडेट मिळणार आहे. असे म्हटले जात आहे, आयफोन १५ ही सिरीज iOS 17 स्टेबल अपडेट मिळवणारी पहिली सिरीज असेल.
iOS 17 अपडेट मिळणाऱ्या आयफोन्सची यादी
iPhone 14
iPhone 14 Plus
iPhone 14 Pro
iPhone 14 Pro Max
iPhone 13
iPhone 13 mini
iPhone 13 Pro
iPhone 13 Pro Max
iPhone 12
iPhone 12 mini
iPhone 12 Pro
iPhone 12 Pro Max
iPhone 11
iPhone 11 Pro
iPhone 11 Pro Max
iPhone XS
iPhone XS Max
iPhone XR
iPhone SE (2nd generation or later)